मशिदींमधून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा आरोप
https://prahaar.in/2026/07/31/nandurbar-rain-update-torrential-rain-wreaks-havoc-in-nandurbar-district/
मुंबई : विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेअंतर्गत महाराष्ट्रात आतापर्यंत ४० लाखांहून अधिक बांगलादेशी नागरिकांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे गणना पत्र (इन्यूमरेशन फॉर्म) भरल्याचा खळबळजनक दावा भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. मशिदींमधून मोठ्या प्रमाणावर हे बोगस फॉर्म भरून घेतले जात असून, महाराष्ट्राच्या मतदार यादीत एकाही बांगलादेशी नागरिकाचे नाव राहू देणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
https://prahaar.in/2026/07/31/rajapur-ganga-after-seven-and-a-half-months-the-rajapur-ganga-flows-again-amidst-heavy-rain-devotees-overjoyed/
वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलताना किरीट सोमय्या यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, मशिदींच्या माध्यमातून बोगस अर्ज भरण्याची मोहीम राबवली जात आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे स्थानिक रहिवासी नसलेल्या व मूळच्या बांगलादेशी असलेल्या सुमारे आठ हजार व्यक्तींनी गणना पत्रे भरली आहेत. या सर्व संशयास्पद आणि बोगस अर्जांवर भाजपच्या वतीने आक्षेप नोंदवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
https://prahaar.in/2026/07/31/stalled-zilla-parishad-and-panchayat-samiti-elections-in-the-state-likely-in-december/
‘एसआयआर’ अंतर्गत अर्ज भरण्यासाठी निवडणूक आयोगाने ८ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या प्रक्रियेचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, केवळ आठ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. राज्यातील सुमारे ३० टक्के मतदारांनी अद्याप आपले गणना पत्र भरलेले नाही. त्यामुळे सर्व वैध व पात्र मतदारांनी विनाविलंब आपले फॉर्म भरून मतदार यादीतील आपले स्थान निश्चित करावे, असे आवाहनही सोमय्या यांनी या वेळी केले.