Home ब्रेकिंग न्यूज Devendra Fadnavis : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक २०२९ पर्यंत पूर्ण करा!

Devendra Fadnavis : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक २०२९ पर्यंत पूर्ण करा!

0
Devendra Fadnavis : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक २०२९ पर्यंत पूर्ण करा!
devendra fadnavis (3)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; चिरागनगर येथील स्मारकाचा भूमिपूजन सोहळा संपन्न

मुंबई : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य आणि विचार हे वंचित व शोषित समाजाच्या संघर्षाचे जिवंत प्रतीक असून, चिरागनगर येथे उभारण्यात येणाऱ्या त्यांच्या स्मारकाचे काम सर्व यंत्रणांनी समन्वयाने जुलै २०२९ पर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी शुक्रवारी दिले. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (SRA) वतीने उभारण्यात येणाऱ्या ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था’ (आर्टी) आणि स्मारकाच्या पहिल्या टप्प्याच्या भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

https://prahaar.in/2026/07/31/rajapur-ganga-after-seven-and-a-half-months-the-rajapur-ganga-flows-again-amidst-heavy-rain-devotees-overjoyed/

घाटकोपर(Ghatkopar) येथील चिरागनगरमध्ये आयोजित या सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, विविध खात्यांचे मंत्री, लोकप्रतिनिधी आणि अण्णा भाऊ साठे यांचे कुटुंबीय उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, २०१६ मध्ये घेतलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार हे स्मारक खासगी विकासकाऐवजी एसआरएमार्फत उभारले जात असल्याने कामात पारदर्शकता आणि गती येईल. परिसरातील रहिवाशांच्या पुनर्वसनाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून, पात्र किंवा अपात्र अशा प्रत्येक नागरिकाला योग्य घर देऊनच हे स्मारक उभे राहील. या प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांच्या हस्ते लोकार्पण करण्याचा मानस मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

https://prahaar.in/2026/07/31/nandurbar-rain-update-torrential-rain-wreaks-havoc-in-nandurbar-district/

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पासाठी सुमारे ३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे सांगत निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही दिली. तसेच अण्णा भाऊंच्या वाटेगाव या मूळ गावीही ५० कोटी खर्चाचे स्वतंत्र स्मारक उभारले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ‘बार्टी’च्या धर्तीवर स्थापन झालेली ‘आर्टी’ संस्था मातंग समाजातील तरुणांना शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल असा विश्वास व्यक्त केला.

https://prahaar.in/2026/07/31/stalled-zilla-parishad-and-panchayat-samiti-elections-in-the-state-likely-in-december/

स्मारकाची वैशिष्ट्ये

या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकामध्ये अण्णा भाऊ साठे यांचा २० मीटर उंचीचा कांस्य पुतळा, लेझर शो, ऑडिओ-व्हिज्युअल डिजिटल दालन, वाटेगाव ते मुंबई या २५५ किमीच्या पायी प्रवासाचे दालन आणि ६ मीटर उंच प्रेरणा भिंत उभारली जाणार आहे. याशिवाय ग्रंथालय, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, कौशल्य विकास केंद्र आणि १५० गाड्यांची पार्किंग व्यवस्था असणार आहे. कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘पारदर्शकतेतून परिवर्तनांकडे’ या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन तसेच अण्णा भाऊंच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here