Home ताज्या घडामोडी Rat flees : दहा लाखांचा हिरा घेऊन उंदीर फरार; व्हिडीओ होतोय व्हायरल

Rat flees : दहा लाखांचा हिरा घेऊन उंदीर फरार; व्हिडीओ होतोय व्हायरल

Rat flees : दहा लाखांचा हिरा घेऊन उंदीर फरार; व्हिडीओ होतोय व्हायरल

कर्नाटक :कर्नाटकातील तुमकुरू येथे घडलेल्या एका अनोख्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. एका दागिन्याच्या दुकानातून तब्बल १० लाख रुपयांचे हिरे आणि सोन्याचे दागिने अचानक गायब झाले. सुरुवातीला दुकानमालकाला चोरीचा संशय आला, मात्र सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर समोर आलेले दृश्य पाहून सर्वजण अवाक् झाले. कारण हा ‘चोर’ कोणताही माणूस नसून एक उंदीर होता.ही घटना तुमकुरू शहरातील कॅलटेक्स सर्कलजवळील विश्वास ज्वेलर्स या दुकानात घडली. दुसऱ्या दिवशी सकाळी कर्मचारी दुकानात आले असता सुमारे ५० ग्रॅम वजनाचे हिरेजडित आणि सोन्याचे दागिने गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यामध्ये हिऱ्यांच्या अंगठ्या, सोन्याचे नेकलेस आणि इतर मौल्यवान दागिन्यांचा समावेश होता. या दागिन्यांची किंमत सुमारे १० लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे.दुकानाचे शटर पूर्णपणे सुरक्षित होते. जबरदस्तीने प्रवेश केल्याचे किंवा चोरीचे कोणतेही संकेत दिसत नव्हते. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी पोलिसांकडे धाव घेण्यापूर्वी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचा निर्णय घेतला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

 

 

https://prahaar.in/2026/07/31/good-news-for-those-planning-a-trip-to-mulshi-pmps-special-tourist-bus-service-has-launched-enjoy-a-nature-tour-for-just-%e2%82%b9500/

सीसीटीव्ही फुटेजमध्ये जे दृश्य दिसले, ते पाहून सर्वजण थक्क झाले. एका उंदराने आपल्या तोंडात हिऱ्यांच्या अंगठ्या आणि सोन्याचे दागिने धरून एकामागोमाग एक दुकानाच्या एका कोपऱ्यात ओढत नेल्याचे स्पष्ट दिसत होते.फुटेजच्या आधारे कर्मचाऱ्यांनी उंदराचा मार्ग शोधला. तपासादरम्यान त्यांना दुकानातील एका कोपऱ्यात उंदराचे बिळ सापडले. काळजीपूर्वक खोदकाम केल्यानंतर त्या बिळातून गायब झालेले १० हिऱ्यांच्या अंगठ्या आणि तीन सोन्याचे नेकलेस यांसह सर्व दागिने सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.या अनोख्या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकांनी हा प्रकार एखाद्या चित्रपटातील प्रसंगासारखा असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. सुदैवाने सर्व दागिने सुरक्षित परत मिळाल्याने ज्वेलर्सने सुटकेचा निश्वास सोडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here