Home ब्रेकिंग न्यूज Orange Alert : IMD चा ऑरेंज अलर्ट! मुंबईसह महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांत पुढील काही तास मुसळधार पावसाची शक्यता

Orange Alert : IMD चा ऑरेंज अलर्ट! मुंबईसह महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांत पुढील काही तास मुसळधार पावसाची शक्यता

0
Orange Alert : IMD चा ऑरेंज अलर्ट! मुंबईसह महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांत पुढील काही तास मुसळधार पावसाची शक्यता
Orange Alert

मुंबई : भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department – IMD) शुक्रवारी (३१ जुलै) सकाळी १० वाजता नाऊकास्ट इशारा (Nowcast Warning) जारी केला आहे. हा इशारा पुढील काही तासांसाठी वैध असून राज्यातील ११ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आला आहे.

IMD च्या अंदाजानुसार, मुंबई, रायगड, छत्रपती संभाजीनगर, पुणे, बीड, अहिल्यानगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना आणि लातूर जिल्ह्यांतील काही ठिकाणी मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या पावसाच्या सरी (Moderate to Intense Rain Spells) पडण्याची शक्यता आहे.

https://prahaar.in/2026/07/31/nitesh-rane-no-fishing-of-any-kind-is-permitted-in-the-states-territorial-waters-until-august-15/

हवामान विभागाने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सखल भागात पाणी साचणे, वाहतुकीवर परिणाम होणे आणि दृश्यमानता कमी होण्याची शक्यता असल्याने अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. प्रशासनानेही नागरिकांनी हवामान विभागाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here