Home ब्रेकिंग न्यूज Nitesh Rane : १५ ऑगस्टपर्यंत राज्याच्या सागरी हद्दीत कोणत्याही प्रकारची मासेमारी करता येणार नाही!

Nitesh Rane : १५ ऑगस्टपर्यंत राज्याच्या सागरी हद्दीत कोणत्याही प्रकारची मासेमारी करता येणार नाही!

0
Nitesh Rane : १५ ऑगस्टपर्यंत राज्याच्या सागरी हद्दीत कोणत्याही प्रकारची मासेमारी करता येणार नाही!
Nitesh Rane

मंत्री नितेश राणे यांचा पुनरुच्चार; मच्छीमारांना सहकार्याचे आवाहन

मुंबई : महाराष्ट्र सरकारने १५ ऑगस्टपर्यंत राज्याच्या सागरी हद्दीत मासेमारीवर पूर्णपणे बंदी घातली असून, या नियमाचे सर्वांनी काटेकोर पालन करावे, असा पुनरुच्चार राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी शुक्रवारी केला. १२ नॉटिकल मैल या राज्याच्या सागरी हद्दीत कोणत्याही प्रकारच्या मासेमारीला परवानगी नसून, मच्छीमार बांधवांनी या कालावधीत समुद्रात न उतरता शासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

https://prahaar.in/2026/07/31/death-toll-in-bhiwandi-building-collapse-rises-to-8-two-victims-yet-to-be-identified-rescue-operations-underway/

राज्य सरकारच्या (State Government) मत्स्यव्यवसाय विभागाचे सर्व अधिकारी यासंदर्भात पूर्णपणे सतर्क आणि सज्ज आहेत. बंदीच्या या काळात राज्याच्या हद्दीत जाऊन कोणीही मासेमारी करणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. तसेच, या कालावधीमध्ये मासेमारीसाठी लागणारे डिझेल, पास किंवा कूपन यांसारखे कोणतेही सहकार्य महाराष्ट्र सरकारच्या मत्स्य खात्याच्या वतीने कोणालाही दिले जाणार नाही, असे मंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले.

मासेमारी बंदीचा हा काळ पाळल्यामुळे सागरी जीवांचे प्रजनन योग्य रीतीने होऊन मत्स्योत्पादनात मोठी वाढ होते. याचा फायदा पुढे जाऊन मच्छीमारांच्या आर्थिक उन्नतीसाठीच होणार आहे. त्यामुळे सर्व मच्छीमार बांधवांनी १५ ऑगस्टपर्यंत ही बंदी प्रामाणिकपणे पाळावी आणि मत्स्य खात्याला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन मंत्री राणे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here