रायगड : डिजिटल अरेस्ट, शेअर मार्केटमध्ये मोठ्या परताव्याचे आमिष आणि विविध ऑनलाइन माध्यमांतून नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर टोळीविरोधात रायगड पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे ३५ कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात २३ गुन्हे उघडकीस आले असून टोळीच्या मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आली आहे.(Raigad News)
https://prahaar.in/2026/07/30/cashless-petro-cards-now-for-ambulances-in-the-state/
तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यात वाढत्या डिजिटल व्यवहारांचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगारांनी ‘म्यूल बँक खाती’ वापरून फसवणुकीची रक्कम विविध खात्यांमध्ये वळविली. आर्थिक मोबदल्याच्या बदल्यात काही व्यक्तींनी स्वतःची बँक खाती गुन्हेगारांच्या ताब्यात दिली होती. या खात्यांच्या माध्यमातून देशभरातील सायबर फसवणुकीची रक्कम जमा करून तिची अफरातफर केली जात असल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले.(Cybercrime)
https://prahaar.in/2026/07/30/education-department-issues-notice-to-these-16-schools-in-nashik-district/
या प्रकरणाचा रायगड पोलिसांकडून गेल्या काही दिवसांपासून सखोल तपास सुरू होता. तपासादरम्यान अनेक म्यूल खातेधारकांची भूमिका संशयास्पद आढळून आल्यानंतर पोलिसांनी साखळी पद्धतीने कारवाई करत सायबर पोलीस ठाण्यासह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल केले.(Marathi News)
https://prahaar.in/2026/07/30/funds-worth-%e2%82%b97000-crore-distributed-for-farm-loan-waivers/
सायबर पोलीस ठाण्यात ११ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून श्रीवर्धन, अलिबाग, रोहा, नागोठणे, कर्जत, रसायनी, माणगाव, खोपोली, पोयनाड, पेण आणि कोलाड या पोलीस ठाण्यांमध्येही संबंधित गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या कारवाईमुळे सायबर गुन्हेगारीच्या संघटित साखळीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. या रॅकेटमधील इतर आरोपींचा शोध सुरू असून प्रकरणाचा पुढील तपास रायगड पोलीस करत आहेत.