Home क्रीडा England Coach Change : ईसीबीचा मोठा निर्णय! ब्रेंडन मॅक्युलमच्या जागी स्टीफन फ्लेमिंग यांची इंग्लंडच्या कसोटी प्रशिक्षकपदी नियुक्ती

England Coach Change : ईसीबीचा मोठा निर्णय! ब्रेंडन मॅक्युलमच्या जागी स्टीफन फ्लेमिंग यांची इंग्लंडच्या कसोटी प्रशिक्षकपदी नियुक्ती

0
England Coach Change : ईसीबीचा मोठा निर्णय! ब्रेंडन मॅक्युलमच्या जागी स्टीफन फ्लेमिंग यांची इंग्लंडच्या कसोटी प्रशिक्षकपदी नियुक्ती

मुंबई : इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) गुरुवार, ३० जुलै रोजी कसोटी संघाच्या व्यवस्थापनात मोठे बदल केले आहेत. ब्रेंडन मॅक्युलमच्या जागी बोर्डाने स्टीफन फ्लेमिंग यांना कसोटी संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी दिली आहे. तसेच, बोर्डाने जो रुटला संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे.स्टीफन फ्लेमिंग हे गेल्या १८ वर्षांपासून चेन्नई सुपर किंग्सचे मुख्य प्रशिक्षक आहेत. त्यांच्या नेतृत्वात संघाने १२ वेळा आयपीएलच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे. त्यापैकी पाच वेळा संघाने विजेतेपद पटकावले आहे. त्यांनी वेग-वेगळ्या टी-२० संघात मुख्य प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे. फ्लेमिंग हे जागतिक क्रिकेटमधील सर्वात यशस्वी प्रशिक्षकांपैकी एक मानले जातात. तसेच, ते पहिल्यांदाच एखाद्या आंतरराष्ट्रीय संघाचे मुख्य प्रशिक्षकपद सांभाळणार आहेत. (England Coach Change)

जागतिक क्रिकेटमध्ये उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून ओळख

फ्लेमिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सीएसकेने विक्रमी पाच इंडियन प्रीमियर लीग विजेतेपदे जिंकले आहे. तसेच , संघाने विक्रमी दहा वेळा अंतिम फेरी गाठण्याचीही कामगिरी केली आहे. फ्लेमिंग यांनी २०२३ मध्ये सदर्न ब्रेव्हला ‘द हंड्रेड’ पुरुष स्पर्धेच्या अंतिम फेरीतही पोहोचवले होते, तसेच त्यांनी दक्षिण आफ्रिका आणि अमेरिकेतील सीएसकेच्या संलग्न संघांना आणि मेलबर्न स्टार्सलाही प्रशिक्षण दिले आहे. (Stephen Fleming)

https://prahaar.in/2026/07/30/special-court-sanctioned-for-ahilyanagar-to-try-atrocities-act-cases/

प्रशिक्षक म्हणून नियुक्त झाल्यानंतर स्टीफन यांची प्रतिक्रिया

मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्याबद्दल स्टीफन फ्लेमिंग म्हणाले, “इंग्लंड संघात कसोटी प्रशिक्षक म्हणून सामील होताना मला प्रचंड आनंद होत आहे. हे जागतिक क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठित प्रशिक्षक पदांपैकी एक आहे आणि या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल मी सन्मानित झालो आहे.”

जो रुट नवा कसोटी कर्णधार !

फ्लेमिंग यांच्या नियुक्तीनंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने जो रुटला याला नवा कसोटी कर्णधार घोषित केले आहे. जो रुटला २०१७ ते २०२२ या कार्यकाळात इंग्लंड कसोटी संघाचे नेतृत्व करत होता. जो रुटला इंग्लंड कसोटी क्रिकेटच्या इतिहासात कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने जिंकणारा खेळाडू आहे. त्याने ६५ सामन्यांमध्ये २७ सामने जिंकले आहेत. (Joe Root)

https://prahaar.in/2026/07/30/why-was-there-no-glimpse-of-hanuman-in-the-ramayana-trailer-sunny-deol-finally-breaks-his-silence/

इंग्लंड कसोटी संघाचा कर्णधार रूट म्हणाला, “पुन्हा एकदा इंग्लंड पुरुष कसोटी संघाचा कर्णधार होण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे. कसोटी कर्णधारपद हे एक कठीण पण अत्यंत समाधान देणारे काम आहे आणि गेल्या महिन्यात (ब्रेंडन) मॅक्युलमसोबत काम करताना त्याचा पुन्हा एकदा थोडा अनुभव घेतल्यानंतर, खेळाडूंच्या या पुढच्या पिढीला पुढे नेण्यासाठी मी उत्सुक आहे.इंग्लंडने संघाने मागच्या महिन्यात न्युझीलंड विरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका १-२ अशी गनावली . तेव्हा संघाचा कर्णधार बेम स्टोक्स आणि मॅक्युलमन होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here