२०२६ च्या एफआयएच (FIH) हॉकी विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर पुरुष आणि महिला राष्ट्रीय संघांच्या जर्सीचा पारंपरिक निळा रंग बदलून तो ‘केशरी’ करण्यात आला आहे. या निर्णयावर सोशल मीडियावर आणि क्रीडा वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. विशेषतः पुरुष संघाचे माजी कर्णधार विरेन रासकिन्हा यांनी या बदलावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या वाढत्या टीकेची व चर्चांची दखल घेत अखेर हॉकी इंडियाने एका सविस्तर निवेदनाद्वारे यामागील कारणांचे स्पष्टीकरण दिले आहे.
https://prahaar.in/2026/07/30/anger-over-the-daughter-eloping-and-getting-married/
हॉकी इंडियाने स्पष्ट केले आहे की, जर्सीचा रंग बदलण्याचा निर्णय हा पूर्णपणे तांत्रिक कारणांवर आणि खेळाडू तसेच साहाय्यक कर्मचाऱ्यांच्या शिफारशींवर आधारित होता. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या नियमांनुसार सध्या निळ्या रंगाच्या सिंथेटिक खेळपट्ट्या (Blue Synthetic Pitches) हा जागतिक मानक रंग बनला आहे. मात्र, या निळ्या खेळपट्ट्यांवर खेळाडूंचा पारंपरिक निळा गणवेश दृश्यात्मकरीत्या (Visually) पूर्णपणे मिसळून जात असल्याचे निदर्शनास आले. या दृश्य साम्यामुळे (Visual Overlap) मैदानावर खेळाडूंची स्पष्टता आणि दृश्यमानता (Visibility) यावर परिणाम होत होता, ज्यामुळे थेट खेळाच्या कामगिरीत अडथळा येत होता.
https://prahaar.in/2026/07/30/soanm-wangchuk-sonam-wangchuk-who-was-on-a-hunger-strike-against-the-modi-government-has-now-praised-the-modi-government-know-what-exactly-happened/
या तांत्रिक समस्येवर मात करण्यासाठी संघ व्यवस्थापनाने पर्यायी रंगांचा शोध सुरू केला. खेळाडू आणि प्रशिक्षक वर्गाने पिवळा किंवा केशरी यांसारखे रंग सुचवले. यावर सविस्तर विचारविनिमय केल्यानंतर अखेर केशरी रंग निश्चित करण्यात आला. हा रंग निवडण्यामागे केवळ तांत्रिक गरज नव्हती, तर या रंगाला आपल्या देशाच्या राष्ट्रध्वजात विशेष स्थान असून तो शौर्य, त्याग आणि राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक मानला जातो, असेही नियामक मंडळाने नमूद केले.
https://prahaar.in/2026/07/30/theres-no-pakistani-kashmir-india-slams-new-york-times-report-on-pok/
यापूर्वीही भारतीय हॉकीमध्ये जर्सीच्या रंगांमध्ये बदल करण्यात आल्याची आठवण या निवेदनात करून देण्यात आली आहे. २०१४ च्या एफआयएच हॉकी विश्वचषदरम्यान भारतीय संघाची जर्सी पिवळ्या रंगाची करण्यात आली होती, तर २०१८ च्या विश्वचषकात ती पूर्णपणे वेगळ्या डिझाइनसह आकाशी निळ्या रंगात बदलण्यात आली होती. त्यामुळे हा बदल नवीन नसून वेळेनुसार आणि गरजेनुसार करण्यात आला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
https://prahaar.in/2026/07/30/demanded-a-bribe-of-%e2%82%b971000-for-the-land-survey-and/
आगामी काळात नेदरलँड्स आणि बेल्जियम येथे होणाऱ्या या प्रतिष्ठित विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष व महिला संघ पारंपरिक निळ्या रंगाऐवजी या नवीन केशरी रंगाच्या जर्सीत मैदानात उतरणार आहेत. तांत्रिक सुलभता आणि राष्ट्रीय अभिमानाचा समन्वय साधत घेतलेल्या या निर्णयामुळे खेळाडूंना मैदानात अधिक स्पष्टता लाभेल, असा विश्वास हॉकी इंडियाने व्यक्त केला आहे.