आजच्या डिजिटल युगात सुविधांची कमतरता नसली, तरी त्या प्रत्येक गोष्टीचा अचूक आणि प्रभावी वापर करून यश मिळवणे ही एक वेगळीच जिद्द असते. ओडिशामधील एका सामान्य कुटुंबातून आलेल्या प्रसुची पांडा (Prasuci Panda) हिने हेच सिद्ध करून दाखवले आहे. कोणतीही व्यावसायिक पार्श्वभूमी किंवा मोठ्या ‘ग्रूमिंग अकादमी’चे प्रशिक्षण पाठीशी नसताना, केवळ स्वतःची जिद्द, कठोर परिश्रम आणि गुगल-इंटरनेटच्या मदतीने प्रसुचीने ‘मिस टीन युनिव्हर्स इंडिया २०२६’ (Miss Teen Universe India 2026) हा मानाचा किताब पटकावला आहे. तिच्या या ऐतिहासिक यशामुळे केवळ तिच्या कुटुंबाचेच नव्हे, तर संपूर्ण ओडिशा राज्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर उंचावले आहे.
https://prahaar.in/2026/07/28/did-mahabharatas-draupadi-invent-pani-puri/
प्रशिक्षण नाही, पण इंटरनेटची साथ
मिळालेल्या माहितीनुसार, प्रसुची पांडा ही सध्या ११ व्या इयत्तेत शिक्षण घेत आहे. तिने यंदाच्या वर्षी एप्रिलपासून या स्पर्धेची कसून तयारी सुरू केली होती. विशेष म्हणजे, या क्षेत्राशी संबंधित कोणतीही पूर्वकल्पना किंवा मार्गदर्शन तिच्या कुटुंबाकडे नव्हते. इतर स्पर्धकांसोबत अनुभवी ट्रेनर आणि तज्ज्ञांची संपूर्ण टीम होती, मात्र प्रसुचीने आपली संपूर्ण तयारी स्वतःच्या बळावर केली. रॅम्प वॉक कसा करावा, व्यक्तिमत्त्व कसे घडवावे (ग्रूमिंग) आणि संवाद कौशल्ये कशी सुधारवीत, या सर्व गोष्टी तिने इंटरनेट आणि गुगलच्या माध्यमातून शिकून आत्मसात केल्या. पहिल्याच प्रयत्नात आणि कोणत्याही मोठ्या अकादमीच्या मदतीशिवाय राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा जिंकणे ही तिच्यासाठी आणि तिच्या कुटुंबीयांसाठी अत्यंत अभिमानास्पद बाब ठरली आहे.
https://prahaar.in/2026/07/28/valluri-ajay-babu-who-is-valluri-ajay-babu-from-traveling-by-bus-to-winning-a-medal-a-16-year-old-boy-has-surpassed-his-fathers-achievements/
भव्य स्वागत आणि आंतरराष्ट्रीय मंचावर झेप
स्पर्धेत घवघवीत यश संपादन करून भुवनेश्वर येथे परतल्यानंतर ओडिशाच्या या होतकरू लेकीचे अत्यंत दणक्यात आणि भव्य स्वागत करण्यात आले. शहरातील एका नामांकित हॉटेलमध्ये तिच्यासाठी विशेष अभिनंदन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात तिला शुभेच्छा देण्यासाठी तिच्या शेकडो चाहत्यांनी आणि समर्थकांनी गर्दी केली होती.
https://prahaar.in/2026/07/28/obsessed-with-the-lock-upp-show-after-a-fight-with-a-friend-a-young-woman-hung-off-the-balcony-of-the-16th-floor-the-video-has-gone-viral/
प्रसुचीच्या आई राणी पांडा यांनी लेकीच्या या संघर्षाबद्दल बोलताना सांगितले की, “हा प्रवास आमच्या कुटुंबासाठी पूर्णपणे नवीन आणि आव्हानात्मक होता. जेव्हा प्रसुचीने या क्षेत्रात जाण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा आम्हाला याबद्दल काहीच माहिती नव्हती. परंतु, तिने स्वतः सर्व तयारी केली आणि आज आमच्या लेकीमुळे संपूर्ण जग आम्हाला ओळखत आहे. आम्ही नेहमीच तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू.”
https://prahaar.in/2026/07/28/creative-reuse-of-empty-plastic-bottles-make-these-5-useful-items-at-home-instead-of-throwing-them-in-the-trash/
आता आंतरराष्ट्रीय मंचावर भारताचे प्रतिनिधित्व
पहिलेच राष्ट्रीय विजेतेपद पटकावल्यानंतर प्रसुची आता एका मोठ्या आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी सज्ज होत आहे. ती आगामी वर्षात आंतरराष्ट्रीय मंचावर भारताचे प्रतिनिधित्व करणार असून, जागतिक पातळीवर देशाचा झेंडा फडकवण्यासाठी ती उत्सुक आहे. तिच्या या यशाने हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मोठी साधनसामग्री नव्हे, तर तीव्र इच्छाशक्ती आणि मेहनतीची जोड असणे सर्वात महत्त्वाचे असते.