त्रिनिदाद : वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यात सध्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजच्या वेगवान गोलंदाज जस्टिन ग्रीव्सने इतिहास रचला. त्याने कसोटी सामन्याच्या इतिहासातील सर्वात थरारक स्पेलपैकी एक टाकून संपूर्ण सामन्याचे चित्र बदलून टाकले. ग्रीव्सने त्याच्या पाच षटकांच्या स्पेलमध्ये लागोपाठ पाच मेडन टाकून पाच विकेट्स घेतल्या.
https://prahaar.in/2026/07/28/bharat-gogawale-does-not-have-the-authority-to-decide-who-will-go-to-delhi-minister-jaykumar-gore-pulls-him-up/
पाच षटकात पाच विकेट्स
या सामन्याच्या सुरुवातीला जस्टिन ग्रीव्सच्या सहा ओव्हर्समध्ये २७ धावा देऊन शून्य विकेट्स होत्या. ग्रीव्हासने आपल्या सातव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पहिली विकेट घेतली. त्यानंतर त्याने लागोपाठ चार षटकात पाच विकेट्स घेतल्या आणि या पाच षटकांच्या स्पेलमध्ये त्याने एकही रन दिला नाही. या पाचही ओव्हर्स त्याने ‘मेडन’ टाकल्या आणि प्रत्येक ओव्हरमध्ये त्याने एक विकेट घेतली. डावाच्या शेवटी ग्रीव्हासचा स्कोअर ११ ओव्हर्स, ६ मेडन, २७ रन आणि ५ विकेट असा झाला.
https://prahaar.in/2026/07/28/driver-turns-guardian-angel-bus-teetering-on-the-edge-of-a-200-foot-deep-gorge-drivers-quick-thinking-saves-the-lives-of-45-passengers/
View this post on Instagram
असा रंगला सामना:
या सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी केली. वेस्ट इंडिजकडून शाई होपने १८२ चेंडूंमध्ये ९२ धावांची खेळी करत संघाला ३०० धावांचा टप्पा गाठण्यास मदत केली. या डावात वेस्ट इंडिज संघाने ९८ षटाकत ३११ धावा केल्या तर पाकिस्तानकडून मोहम्मग अलीने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. पाकिस्तानच्या फलंदाजीच्या वेळी पाकिस्तनाचा ओपनर अजान अवैस शून्यवर बाद झाला. त्यानंतर इमाम उल हक आणि शान मसूदने १५५ धावांची भागीदारी केली. यात इमाम उल हकने ६३ आणि शान मसूदने १०९ धावा केल्या .पण ग्रीव्सच्या वादळी स्पेलपुढे पाकिस्तानचा एकही बॅटर टिकू शकला नाही. ग्रीव्सने शतक केलेल्या शान मसूदला बोल्ड केलं, यानंतर त्याने मोहम्मद रिझवानला १२ रनवर, आमिर जमालला ३ रनवर, अली उस्मानला शून्य रनवर आऊट केलं. यानंतर ग्रीव्सने मोहम्मद अब्बासला शून्य रनवर पॅव्हेलियनमध्ये पाठवून आपल्या ५ विकेट पूर्ण केल्या.
https://prahaar.in/2026/07/28/supriya-sule-first-tatkare-then-supriya-sule-amit-shahs-meetings-spark-a-flurry-of-political-speculation-what-exactly-was-discussed/
शान मसूदच्या शतकी खेलीनंतर कर्णधार बाबर अझामने २३, सलमान आगाने २०, खुर्रम शहाजादने १९ धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून केमार रोच आणि शेमार जोसेफने प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. पाकिस्तानचा पूर्ण संघ ८० षटाकत २८२ धावांवर ऑलआऊट झाली.