भारताचा ३५ धावांनी दणदणीत विजय !
हरारे : भारत आणि झिम्बाब्वे यांच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने झिम्बाब्वेवर ३५ धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह भारतीय संघाने झिम्बाब्वेचा ३-० ने व्हाईटवॉश केला आहे. या सामन्यात १५ वर्षाच्या वैभवने झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना धू-धू धुतले. त्याने ४९ चेंडूंमध्ये ८१ धावांची स्फोटक खेळी करत सर्वांचे लक्ष्य वेधले आहे. आठ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर त्याने ८१ धावांची खेळी केली.(Ind vs Zim)
View this post on Instagram
https://prahaar.in/2026/07/26/56-usable-water-storage-in-the-state-however-concerns-persist-in-marathwada/
कर्णधार श्रेयस अय्यरने या सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. वैभव सूर्यवंशीने आक्रमक फलंदाजी करत पहिल्याच षटकात १७ धावा ठोकल्या. मात्र मुजरबानीने दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडुवर अभिषेकला बाद करत भारताला पहिला झटका दिला. यानंतर वैभव आणि ईशान चांगली भागीदारी केली. भारताने पॉवरप्लेमध्ये ६३ धावा केल्या. वैभवने या सामन्यात आठ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ४९ चेंडुंमध्ये ८१ धावांची स्फोटक खेळी केली. यानंतर ईशान किशनने २९ धावांची , तर कर्णधार श्रेयस अय्यरने १८ चेंडूंमध्ये २७ धावांची खेळी केली. शेवटी रिंकू सिंहच्या २५ धावांच्या उपयुक्त खेळीच्या जोरावर भारताला झिम्बाब्वेला १९३ धावांचे लक्ष्य देता आले. झिम्बाब्वेसाठी ब्रॅड इव्हान्सनने सर्वाधिक २ बळी घेतले. (Ind vs Zim)
https://prahaar.in/2026/07/26/narendra-modi-pm-modi-decides-to-set-up-a-high-level-committee-led-by-nandan-nilekani-to-reform-the-examination-system-and-curb-paper-leaks/
झिम्बाब्वेची खराब सुरुवात
१९३ धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वेची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. मयंक यादवने पहिल्या चेंडुवर ब्रायन बेनेटला शून्यावर बाद केले. झिम्बाब्वेने लागोपाठ चार विकेट्स गमावल्या. अडचणीत सापडलेल्या झिम्बाब्वेसाठी रायन बर्लने एकाकी झुंज दिली. त्याने ४३ चेंडूंमध्ये ५ चौकारांसह नाबाद ५४ धावांची खेळी केली. वेस्ली मढीवेरेने २८ धावांचे योगदान देत त्याला साथ दिली आणि दोघांनी पाचव्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी केली. मात्र, वाढत्या आवश्यक धावगतीमुळे झिम्बाब्वेवरील दबाव कायम राहिला.भारतीय गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा करत झिम्बाब्वेला मोठी भागीदारी उभारू दिली नाही. मयंक यादवने ३.५ षटकांत २८ धावा देत ३ महत्त्वाचे बळी घेतले. यश ठाकूरने २ बळी मिळवले, तर रवी बिश्नोई आणि अशोक शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. झिम्बाब्वेला २० षटकांत ७ बाद १५६ एवढीच मजल मारता आली आणि भारताचा ३५ धावांनी शानदार विजय झाला. या विजयासह भारताने झिम्बाब्वे विरुद्धची टी २० सामन्यांची मालिका ३-० अशी जिंकली.
View this post on Instagram
वैभव सूर्यवंशीचे पर्व सुरू
वैभव सूर्यवंशीने या मालिकेच्या तीन सामन्यांत १५१ धावा करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या सामन्यातील त्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला आहे. तसेच त्याला मालिकावीर या पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.