Home ब्रेकिंग न्यूज Byculla Police Station Fire: भायखळा पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावर आग; अग्निशमन दलाकडून तातडीने नियंत्रण

Byculla Police Station Fire: भायखळा पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावर आग; अग्निशमन दलाकडून तातडीने नियंत्रण

0
Byculla Police Station Fire: भायखळा पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावर आग; अग्निशमन दलाकडून तातडीने नियंत्रण

मुंबई: मुंबईतील भायखळा पोलीस ठाण्यात रविवारी रात्री आग (Fire) लागल्याची घटना घडली. ही आग पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावर लागल्याची माहिती मिळाली असून, सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाल्याची नोंद नाही.

प्राथमिक माहितीनुसार, रात्री सुमारे 8:24 वाजण्याच्या सुमारास भायखळा पूर्व येथील हंसराज मार्गावरील भायखळा पोलीस ठाण्यात आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. (Mumbai Fire)

https://prahaar.in/2026/07/26/new-bill-against-question-paper-leaks-to-be-introduced-in-the-lok-sabha/

घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, बेस्ट, मुंबई पोलीस आणि संबंधित विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. सर्व यंत्रणांनी संयुक्तपणे आग विझवण्याचे आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम हाती घेतले. (Fire News)

प्राथमिक माहितीनुसार, आग पोलीस ठाण्याच्या जी+1 इमारतीच्या पहिल्या मजल्यापुरती मर्यादित होती. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. (Mumbai Police)

 

View this post on Instagram

 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतर संबंधित यंत्रणांकडून तपास केला जाणार आहे. (Byculla news )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here