पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल – रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये लाखो भाविकांची गर्दी आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक पंढरपूरमध्ये आले आहेत. संपूर्ण पंढरपूरमध्ये चोख बंदोबस्त आहे. सुरक्षेसाठी राज्य राखीव पोलिस दलाचे जवान पण मोठ्या संख्येने तैनात आहेत. या अशा वातावरणात भाविकांच्या सुरक्षेसाठी बंदोबस्तावर असलेल्या राज्य राखीव पोलिस दलाच्या (SRPF) जवानाने स्वतःकडे असलेल्या शस्त्रातून स्वतःवरच गोळी झाडून घेत आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना आषाढी एकादशीच्या दिवशीच पहाटे घडली. आत्महत्या करणाऱ्या राज्य राखीव पोलिस दलाच्या (SRPF) जवानाचे नाव रामेश्वर ध्रुपद साबणे असे आहे.(Pandharpur News)
https://prahaar.in/2026/07/25/bmc-part-of-a-mhada-building-collapses-at-masjid-bunder-6-rescued-2-injured/
आषाढी वारीतील गर्दी आणि सुरक्षा लक्षात घेता SRPF ची तुकडी पंढरपुरात तैनात करण्यात आली होती. या तुकडीतील रामेश्वर ध्रुपद साबणे(Rameshwar Dhrupad Sabne) या जवानाने आत्महत्या केली. पहाटे अडीचच्या सुमारास मंदिरात विठ्ठलाची शासकीय महापूजा सुरू होती. ही पूजा सुरू असतानाच रामेश्वर ध्रुपद साबणेने आत्महत्या केली. गोळीचा आवाज ऐकून सहकारी जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, मात्र गंभीर दुखापतीमुळे रामेश्वर ध्रुपद साबणेचा जागीच मृत्यू झाला.(Crime News)
https://prahaar.in/2026/07/25/it-is-essential-to-engage-in-dialogue-with-young-people-rather-than-simply-giving-them-instructions/
रामेश्वर ध्रुपद साबणेने आत्महत्या केल्याचे लक्षात येताच स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने पुढील कायदेशी कारवाई सुरू करण्यात आली आहे. रामेश्वर ध्रुपद साबणेच्या आत्महत्येचे कारण जाणून घेण्यासाठी तपास सुरू आहे.