हापूर (उत्तर प्रदेश): उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातून एक अत्यंत खळबळजनक आणि संतापजनक प्रकरण समोर आले आहे. एका आरोपीने आपली खरी ओळख लपवून, हिंदू असल्याचे भासवून इंस्टाग्रामच्या माध्यमातून एका विधवेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तिचे वारंवार शारीरिक शोषण केले आणि अश्लील व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेल करत धर्म परिवर्तनासाठी दबाव टाकल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी पीडितेने नगर कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
https://prahaar.in/2026/07/25/ind-vs-zim-zimbabwe-wins-the-toss-and-deals-a-double-blow-to-india-abhishek-and-vaibhav-dismissed-before-the-end-of-the-powerplay/
इन्स्टाग्रामवर ओळख अन् खोट्या नावाचा बनाव
पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीनुसार, सुमारे दोन वर्षांपूर्वी पीडितेची इंस्टाग्रामवर ‘राहुल’ नावाच्या एका तरुणाशी ओळख झाली होती. आरोपीने आपण हिंदू असल्याचे भासवून पीडितेचा विश्वास संपादन केला आणि तिच्याशी जवळीक साधली. मात्र, सुमारे ५-६ महिन्यांच्या संभाषणानांतर पीडितेला समजले की, त्या तरुणाचे खरे नाव ‘मोहसिन’ असून तो हापूरच्या सुलतानपूर गावातील रहिवासी झाहिदचा मुलगा आहे आणि तो सौदी अरेबियामध्ये नोकरी करतो. असे असूनही, आरोपीने लग्नाची खोटी वचने देऊन पीडितेला आपल्या जाळ्यात अडकवून ठेवले.
https://prahaar.in/2026/07/25/what-did-the-modi-government-gain-by-securing-dharmendra-pradhans-resignation-prime-minister-modis-major-masterstroke-snatched-an-opportunity-away-from-the-opposition-parties/
परदेशातून परतल्यानंतर शारीरिक शोषण आणि ब्लॅकमेलिंग
आरोपी मोहसिन १५ जून २०२६ रोजी सौदी अरेबियातून भारतात परतला आणि त्यानंतर तो सातत्याने पीडितेच्या घरी येऊ लागला. त्याने लग्नाचे आमिष दाखवून पीडितेसोबत अनेक वेळा शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि यादरम्यान तिचे काही बनावट अश्लील फोटो व व्हिडिओ रेकॉर्ड केले.
https://prahaar.in/2026/07/25/chatgpt-down-users-are-facing-issues-with-login-chats-and-more-across-web-and-app-article/
जेव्हा पीडितेने त्याच्यावर लग्नासाठी कायदेशीर दबाव टाकला, तेव्हा मोहसिनने स्पष्टपणे नकार दिला. इतकेच नव्हे तर, ते आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्याने पीडितेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. तसेच आरोपी आता देश सोडून परदेशात पळून जाण्याच्या तयारीत असल्याचा आरोपही पीडितेने केला आहे.
https://prahaar.in/2026/07/25/torrential-rain-leaves-700-families-homeless/
इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी कुटुंबीयांचा दबाव
या संपूर्ण प्रकारानंतर जेव्हा पीडिता न्याय मागण्यासाठी आणि लग्नाबद्दल चर्चा करण्यासाठी आरोपीच्या कुटुंबाकडे गेली, तेव्हा आरोपीच्या कुटुंबीयांनी उलटा तिचा छळ केला. तिच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी आणि आधीच्या मुलांचा त्याग करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. पीडितेने स्पष्ट नकार दिल्यानंतर आरोपीने आपला मोबाईल फोन बंद करून संपर्क पूर्णपणे तोडला.
या सर्व प्रकारामुळे पूर्णपणे खचलेल्या आणि त्रस्त झालेल्या पीडितेने हापूर शहर कोतवाली पोलिसात धाव घेत, आरोपी मोहसिन आणि त्याला मदत करणाऱ्या त्याच्या नातेवाईकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या गंभीर प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर तपास सुरू आहे.