Home देश Train Accident : उत्तर प्रदेशमध्ये मोठा रेल्वे अपघात टळला, मालगाडीचे सात डबे रुळावरून घसरले

Train Accident : उत्तर प्रदेशमध्ये मोठा रेल्वे अपघात टळला, मालगाडीचे सात डबे रुळावरून घसरले

0
Train Accident : उत्तर प्रदेशमध्ये मोठा रेल्वे अपघात टळला, मालगाडीचे सात डबे रुळावरून घसरले
train accidenat

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधील अमेठी परिसरात एक मोठा रेल्वे अपघात टळला. पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास सिंदुरवा रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे सात डबे रुळावरून घसरले. स्थानकाजवळ असलेल्या इंदोरामा खत युनिटच्या सायडिंगवर खत वाहून नेणाऱ्या मालगाडीचे सात डबे रुळावरून घसरले. सुदैवाने, कोणताही डबा उलटला नाही आणि चालकाने तात्काळ गाडी थांबवल्यामुळे जीवितहानी टळली. मालगाडीचे सात डबे रुळावरून घसरल्याची माहिती मिळताच, रेल्वेचे अभियांत्रिकी, परिचालन विभाग आणि रेल्वे संरक्षण दलाचे (RPF) पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले.(Uttar Pradesh)

https://prahaar.in/2026/07/25/ind-vs-zim-zimbabwe-wins-the-toss-and-deals-a-double-blow-to-india-abhishek-and-vaibhav-dismissed-before-the-end-of-the-powerplay/

स्थानक परिसर सील करून रूळ दुरुस्तीचे काम सुरू

पहाटे झालेल्या अपघाताची माहिती मिळताच रेल्वे अधिकाऱ्यांनी परिसर सील केला आणि रूळ दुरुस्तीचे काम सुरू केले. या अपघातात सायडिंग ट्रॅकचे नुकसान झाल्याने मालगाड्यांची वाहतूक आणि इंडोरामा येथील खत भरण्याच्या कामावर परिणाम झाला आहे.

https://prahaar.in/2026/07/25/what-did-the-modi-government-gain-by-securing-dharmendra-pradhans-resignation-prime-minister-modis-major-masterstroke-snatched-an-opportunity-away-from-the-opposition-parties/

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार

दुरुस्ती पूर्ण झाल्यावरच कामकाज पुन्हा सुरू होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ट्रेन इंडोरामा सायडिंगजवळ पोहोचताच अचानक नियंत्रणाबाहेर गेली आणि सात डबे रुळावरून घसरले. अपघाताच्या वेळी ट्रेनचा वेग कमी असल्याने, लोको पायलटने ट्रेनवर नियंत्रण मिळवले आणि सावधपणे ब्रेक लावून ती थांबवली. रेल्वे प्रशासन या घटनेच्या कारणांची चौकशी करत आहे.(Train Accident)

https://prahaar.in/2026/07/25/chatgpt-down-users-are-facing-issues-with-login-chats-and-more-across-web-and-app-article/

काही दिवसांपूर्वी गाझियाबादमध्ये रेल्वे दुर्घटना

काही दिवसांपूर्वी गाझियाबाद आणि नवी दिल्ली रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या एका मालगाडीचे सहा डबे अचानक रुळावरून घसरले होते. सुदैवाने, या अपघातात कोणीही जखमी झाले नव्हते. मात्र, सकाळच्या गर्दीच्या वेळी झालेल्या अपघातामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला. परिस्थिती हाताळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने वाहतुकीत बदल केले. मार्ग बंद झाल्यामुळे २४ गाड्या पुरानी दिल्ली-नवी दिल्ली या पर्यायी मार्गावरून वळवण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here