मुंबई : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना आज (२५ जुलै) हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळवला जाणार आहे. पहिल्या सामन्यात भारताने ७ गडी राखून दणदणीत विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आजचा सामना जिंकत टीम इंडिया मालिका खिशात घालण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. (IND vs ZIM 2nd T20)
पहिल्या टी-२० मध्ये युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने अवघ्या १९ चेंडूत अर्धशतक झळकावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याला कर्णधार श्रेयस अय्यर याने नाबाद २८ धावांची साथ दिली होती. गोलंदाजीत मयंक यादव आणि प्रिन्स यादव यांनी प्रत्येकी दोन बळी घेत झिम्बाब्वेला रोखले. मयंक यादवला उत्कृष्ट गोलंदाजीसाठी ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार मिळाला. (IND vs ZIM 2nd T20)
https://prahaar.in/2026/07/25/commonwealth-games-2026-india-opens-its-medal-account-zandu-kumar-wins-bronze-in-para-powerlifting/
श्रेयस अय्यरसमोर इतिहास रचण्याची संधी :
आजच्या सामन्यात श्रेयस अय्यरकडे एक अनोखा विश्वविक्रम करण्याची संधी आहे. जर त्याने टॉस जिंकला, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सलग पहिल्या ९ सामन्यांमध्ये टॉस जिंकणारा जगातील पहिला कर्णधार ठरेल. सध्या हा विक्रम इंग्लंडचे माजी कर्णधार वॉली हॅमंड यांच्या नावावर असून त्यांनी सलग आठ टॉस जिंकले होते. (IND vs ZIM 2nd T20)
पुन्हा वैभव सूर्यवंशीकडे सर्वांचे लक्ष :
पहिल्या सामन्यातील आक्रमक खेळानंतर युवा स्टार वैभव सूर्यवंशीकडून पुन्हा एकदा मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. त्याचबरोबर अभिषेक शर्मा, ईशान किशन, तिलक वर्मा आणि रिंकू सिंह यांच्यावरही फलंदाजीची जबाबदारी असेल. (IND vs ZIM 2nd T20)
https://prahaar.in/2026/07/24/issf-world-cup-sainyam-wins-silver-medal-in-10m-air-pistol/
कधी आणि कुठे पाहाल सामना?
सामना: भारत विरुद्ध झिम्बाब्वे, दुसरा टी-२०
स्थळ: हरारे स्पोर्ट्स क्लब, झिम्बाब्वे
तारीख: २५ जुलै
वेळ: सायंकाळी ४.३० वाजता (भारतीय वेळेनुसार)
टॉस: सायंकाळी ४.०० वाजता (IND vs ZIM 2nd T20)
लाईव्ह सामना कुठे पाहता येणार?
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन :
वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, ईशान किशन (यष्टिरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, रिंकू सिंह, रवि बिश्नोई, प्रिन्स यादव, अशोक शर्मा, मयंक यादव. (IND vs ZIM 2nd T20)
झिम्बाब्वेची संभाव्य प्लेइंग इलेव्हन :
ब्रायन बेनेट, बेन कुरेन, डायोन मायर्स, सिकंदर रझा (कर्णधार), रायन बर्ल, वेस्ले मधेवेरे, तदिवानाशे मारुमानी, ब्रॅड इव्हान्स, न्यूमन न्यामुरी, रिचर्ड नगरवा, ब्लेसिंग मुजारबानी. भारत आजचा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न करणार आहे, तर झिम्बाब्वेसमोर मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी विजय मिळवणे अत्यावश्यक असणार आहे. त्यामुळे हरारेमध्ये आज रोमांचक लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. (IND vs ZIM 2nd T20)