Home महाराष्ट्र नाशिक Nashik News : गंगापूर धरणातून 8, 370 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग

Nashik News : गंगापूर धरणातून 8, 370 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग

0
Nashik News : गंगापूर धरणातून 8, 370 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग

Nashik News : नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर विविध धरणांमधून शनिवारी देखील पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे. गंगापूर धरणातून 8, 370 क्युसेक वेगाने पाणी सोडले जात असून, त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. नदीकाठावरील नागरिकांनी, शेतकर्‍यांनी आणि व्यावसायिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.

https://prahaar.in/2026/07/25/maharashtra-monsoon-update-heavy-rainfall-warning-for-the-state-for-the-next-two-to-three-days/

गंगापूर धरणासह जिल्ह्यातील अन्य धरणांतूनही मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. नांदूर मध्यमेश्वर बंधार्‍यातून सर्वाधिक 71 हजार 497 क्युसेक पाण्याचा प्रवाह पुढे सोडण्यात येत आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या खालच्या प्रवाहातील गावांनी विशेष सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

https://prahaar.in/2026/07/25/then-education-officer-arrested-in-dhule-in-connection-with-the-%e2%82%b9160-crore-shalarth-scam/

धरण विसर्ग (क्युसेकमध्ये)

गंगापूर – 8, 370

कादवा – 13, 716

गौतमी गोदावरी – 500

भावली – 2152

दारणा – 19312

नांदूर मध्यमेश्वर बंधारा – 71,036

भाम – 6359

चणकापूर – 3,074