Dhule crime : अनैतिक संबंधाचा संशय घेऊन पत्नीची हत्या करणाऱ्या नराधम पतीस जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. साक्री तालुक्यातील डांग शिरवाडे येथील मंदाबाई दिलीप सोनवणे या ४८ वर्षीय महिलेची तिच्याच पतीने हत्या केली होती. या नराधम पतीस प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश धुळे श्रीमती एस. एस. भिष्म यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या गुन्ह्यामध्ये सरकारी वकील गणेश पाटील यांनी उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचे संदर्भ देत या गुन्ह्यामध्ये आरोपीस कठोर शिक्षा देण्याची मागणी केली . ही मागणी न्यायालयाने मान्य केली.
https://prahaar.in/2026/07/24/tree-fell-in-the-collectorate-area/
नेमकं प्रकरण काय ?
साक्री तालुक्यातील डांग शिरवाडे याठिकाणी ही घटना घडली होती. डांग शिरवाडे येथील मंदाबाई दिलीप सोनवणे या शेतामध्ये पिकांना पाणी भरण्यासाठी गेल्या होत्या, मात्र त्या घरी परतल्याच नाहीत. त्यांचे पती दिलीप हिराजी सोनवणे हे देखील घरी नसल्यामुळे त्यांची मुलगी सोनाबाई दिलीप सोनवणे ही आई वडीलांना पाहण्यासाठी शेताकडे गेली. त्यावेळेस तिला धक्कादायक गोष्ट पहायला मिळाली. सोनाबाई शेतात जाताच तिने पहिले की तिचे वडील शेतात शांतपणे एकाबाजूला बसलेले होते तर आई शेताच्या बांधावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती.
मुलीला पाहताच वडीलांनी मुलगी सोनाबाईला हिला सांगीतले की, तुझ्या आईचे गावात बऱ्याच लोकांशी प्रेमसंबंध होते, त्यामुळे माझी बदनामी होते. म्हणून मी तिला मारून टाकले. काही वेळातच ही माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली. मयताचा भाऊ पिन्टू काळू गायकवाड याने आरोपीविरुध्द पिंपळनेर पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला. यानंतर आरोपी विरुध्द न्यायालयात दोषारोपत्र दाखल करण्यात आले.
https://prahaar.in/2026/07/24/security-stepped-up-at-sensitive-locations-and-outside-the-residences-of-senior-leaders-in-the-state/
पत्नीची हत्या , पतीस जन्मठेप
न्यायालयात साक्षीदारांची साक्ष अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. बी. डी. भोईटे यांनी घेतली. तसेच भोईटे यांची बदली झाल्यानंतर उर्वरीत साक्षीदार व तपासी अधिकारी यांची साक्ष अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. गणेश वाय. पाटील, यांनी नोंदविली.या कामात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश श श्रीमती एस. एस. भिष्म यांनी सदर खटल्यातील असलेल्या संपुर्ण पुराव्यांचा सांगोपांग विचार करुन आरोपीस जन्मठेपेची शिक्षा तसेच पाच हजार रुपयाचा दंड व तो न भरल्यास तीन महिन्याची सक्त मजुरीची शिक्षेचा आदेश पारीत केला.
त्याचप्रमाणे मयताची मुलगी सोनाबाई दिलीप सोनवणे हिस फौ.व्य.सं. ३५७-अ तथा भारतीय नागरीक संहिता २००३ चे कलम ३९६ अन्वये जिल्हा विधी सेवा प्राधीकरणामार्फत नुकसान भरपाई देण्याकरीता सुचित केले. सदर कामी फिर्यादी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. गणेश वाय. पाटील यांनी व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. श बी. डी. भोईटे यांनी काम पाहिले. त्याकामी त्यांना जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह वाय. तवर, यांचे मार्गदर्शन लाभले.