Nashik News : नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय (Nashik Collector Office) परिसरात भलेमोठे लिंबाचे झाड कोसळल्याची घटना घडली आहे. येथील पार्किंग मध्ये असलेले एक भलेमोठे लिंबाचे झाड अचानक तेथे उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांवर कोसळले. हे झाड कोसळून ८ ते १० वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.
View this post on Instagram
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कोसळले झाड
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील पार्किंगमध्ये अनेक शासकीय अधिकारी आणि कामानिमित्त आलेल्या नागरिकांची वाहने उभी होती. मात्र अचानक पार्किंगमधील जुने आणि भलेमोठे लिंबाचे झाड मुळासकट उन्मळून गाड्यांवर पडले. झाड मोठे असल्याने त्याखाली दाबल्या गेलेल्या ८ ते १० चारचाकी गाड्यांचा चक्काचूर झाला आहे.
https://prahaar.in/2026/07/24/%e2%82%b98500-crore-fund-for-three-roads-for-the-nashik-kumbh-mela/
सुदैवाने जीवितहानी नाही
दरम्यान, झाड कोसळताच मोठा आवाज झाल्याने परिसरात एकच घबराट पसरली. सुदैवाने, झाड पडले त्या क्षणी वाहनांमध्ये किंवा झाडाखाली कोणीही नागरिक उपस्थित नव्हते. त्यामुळे या घटनेत कोणतीही जीवितहानी वा दुखापत झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
https://prahaar.in/2026/07/24/discharge-from-nandur-madhyameshwar-dam-increases/
या घटनेत आय-१०, बोलेरो, फॉर्च्युनरसह अनेक वाहनांचे नुकसान झाले असून, शहरातील धोकादायक व कमकुवत वृक्षांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, रस्त्यावरील आणि वाहनांवरील झाडाच्या फांद्या कापून गाड्या बाजूला काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. या घटनेमुळे काही काळ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गोंधळाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.