Friday, July 24, 2026

Nashik Simhastha Kumbh Mela : कावनाई येथे रविवारी सिंहस्थ महाकुंभ भूमिपूजन व गंगा-गोदावरी पूजन

Nashik Simhastha Kumbh Mela : कावनाई येथे रविवारी सिंहस्थ महाकुंभ भूमिपूजन व गंगा-गोदावरी पूजन

Nashik Simhastha Kumbh Mela : श्री कपिल महामुनी आश्रम ट्रस्ट, श्री क्षेत्र कपिलधारा तीर्थ, स्वर्ग आश्रम, सिंहस्थ कुंभमेळा मूळ स्थान, कावनाई (ता. इगतपुरी, जि. नाशिक) यांच्या वतीने आगामी सिंहस्थ महाकुंभाच्या पार्श्वभूमीवर वैदिक तिथीनुसार भूमिपूजन, वृक्षारोपण तसेच गंगा-गोदावरी पूजन (Ganga-Godavari worship) सोहळ्याचे आयोजन रविवार, दि. २६ जुलै रोजी सकाळी ८.४८ वाजता करण्यात आले आहे.

हा पवित्र धार्मिक सोहळा श्री कपिल महामुनी आश्रमाच्या पावन परिसरात, श्री क्षेत्र कपिलधारा तीर्थ, स्वर्ग आश्रम, सिंहस्थ कुंभमेळा मूळ स्थान तसेच गोदावरी व कपिला नदीच्या गुप्त पवित्र संगमस्थळी आणि सांख्य योगाच्या उगमस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थळी मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. या सोहळ्यात वैदिक मंत्रोच्चार, धार्मिक विधी, भूमिपूजन, वृक्षारोपण आणि गंगा-गोदावरी पूजन यांसारखे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार असून, भाविकांना आध्यात्मिक वातावरणाचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे. (Nashik Simhastha Kumbh Mela)

आगामी सिंहस्थ महाकुंभाच्या तयारीसाठी हा सोहळा अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, परिसरातील तसेच राज्यभरातील भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती अपेक्षित आहे. या पवित्र कार्यक्रमास सर्व धर्मप्रेमी नागरिक, भाविक, साधू-संत, सामाजिक कार्यकर्ते आणि परिसरातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन श्री कपिल महामुनी आश्रम ट्रस्ट, श्री क्षेत्र कपिलधारा तीर्थ तसेच महंत फलहारी बाबा महाराज व जगद्‌गुरू कल्कीराम महाराज यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >