मुंबई : सोशल मीडिया रिल्स क्रिएटर आणि बिग बॉस फेम अभिनेत्री अंकिता वालावलकरने (Ankita Walawalkar) आपल्या भूमिकेबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देत महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण व्यवस्थेसाठी आपण आवाज उठवत आहोत, मात्र त्याचा कोणत्याही संघटनेशी किंवा राजकीय विचारधारेशी संबंध नसल्याचे तिने स्पष्ट केले.
सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिने (Ankita Walawalkar) सांगितले की, “माझा पाठिंबा हा विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांना, गुणवत्तेला आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक असलेल्या प्रामाणिक शिक्षणव्यवस्थेला आहे. कोणत्याही संघटनेला किंवा राजकीय विचारधारेला नव्हे. मी CJP ला पाठिंबा देत नाही.”
https://prahaar.in/2026/07/22/rohit-sharma-ravi-shastri-with-his-innings-rohit-has-effectively-slapped-his-critics-across-the-face-ravi-shastris-forthright-reaction-after-the-century-at-lords/
अलीकडील काही घडामोडींनंतर सोशल मीडियावर तिच्या भूमिकेबाबत विविध चर्चा आणि तर्कवितर्क सुरू होते. त्यानंतर तिने स्वतः पुढे येत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अंकिताने शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता, विद्यार्थ्यांना न्याय आणि गुणवत्तेला प्राधान्य मिळावे, यासाठी आपण सातत्याने भूमिका घेत असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या हिताशी संबंधित मुद्द्यांना पाठिंबा देणे म्हणजे कोणत्याही विशिष्ट संघटनेचे समर्थन करणे असा त्याचा अर्थ होत नाही, असे तिने स्पष्ट नमूद केले. (Ankita Walawalkar)
https://prahaar.in/2026/07/22/isro-recruitment-2026-vssc-462-apprentice-posts-walk-in-selection-on-25-july-details-here/
दरम्यान, अंकिता वालावलकरच्या (Ankita Walawalkar) या वक्तव्यामुळे तिच्या भूमिकेबाबत सुरू असलेल्या सर्व चर्चांना नवे वळण मिळाले असून, त्यांनी कोणत्याही राजकीय किंवा संघटनात्मक भूमिकेपेक्षा विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांना आणि पारदर्शक शिक्षण व्यवस्थेलाच आपला पाठिंबा असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले.