मुंबई : कोकणातील पर्यटनाला नवी चालना देण्यासाठी मुंबई (Mumbai) आणि रत्नागिरीदरम्यान (Ratnagiri) सी-प्लेन सेवा सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्र सागरी मंडळाने (MMB) या प्रकल्पासाठी प्राथमिक स्तरावर प्रक्रिया सुरू केली असून, रत्नागिरीतील भगवती आणि भाट्ये परिसराची सी-प्लेन संचालन केंद्र म्हणून उपयुक्तता तपासली जाणार आहे. यासाठी संबंधित ठिकाणी व्यवहार्यता अभ्यास केला जाणार आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी काही दिवसांपूर्वी रत्नागिरीत सी-प्लेन सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर या प्रकल्पाबाबत उद्योग विभागाशी प्राथमिक चर्चा झाली असून, आता प्रस्ताव महाराष्ट्र सागरी मंडळाच्या मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. (Sea Plane Service)
https://prahaar.in/2026/07/21/pm-modi-cjp-protest-neet-paper-leak-preventing-paper-leaks-a-national-responsibility-pm-modi-on-neet-row/
या प्रकल्पासाठी आवश्यक कायदेशीर आणि प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर तांत्रिक पाहणी सुरू होईल. तज्ज्ञांकडून समुद्रातील प्रवाह, भरती-ओहोटी, वाऱ्याचा वेग, तसेच सी-प्लेनच्या सुरक्षित लँडिंग आणि टेक-ऑफसाठी योग्य जागांची तपासणी केली जाईल. या सर्व बाबींचा अभ्यास करून सविस्तर तांत्रिक अहवाल तयार केला जाणार आहे. (Mumbai Ranatgiri Sea Plane)
यासोबतच प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आहे का, याचाही अभ्यास केला जाणार आहे. यासाठी स्वतंत्र आर्थिक सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार असून, संचालनाचा खर्च, संभाव्य प्रवासी संख्या आणि तिकीट दर यांचा आढावा घेतला जाईल. प्रवाशांना परवडणारे भाडे ठेवतानाच सेवा आर्थिकदृष्ट्या टिकाऊ राहील, यावर भर दिला जाणार आहे. (Sea Plane Service)
https://prahaar.in/2026/07/20/passion-for-tattoos-proves-costly-woman-tests-hiv-positive-within-weeks-doctor-issue-a-serious-warning/
तांत्रिक आणि आर्थिक दोन्ही अहवाल पूर्ण झाल्यानंतर अंतिम मार्ग, उड्डाणांचे वेळापत्रक आणि तिकीट दर निश्चित केले जातील. हा प्रकल्प प्रत्यक्षात आल्यास मुंबई आणि रत्नागिरीमधील प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल. तसेच कोकणातील पर्यटन, स्थानिक अर्थव्यवस्था आणि प्रादेशिक संपर्क व्यवस्थेला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (Kokan Tourism)