कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) ३.० सुधारणांअंतर्गत केंद्र सरकार गिग वर्कर्स, असंघटित क्षेत्रातील कामगार आणि कर्मचारी पेन्शन योजना (EPF)च्या कक्षेबाहेरील खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी नवी अंशदायी पेन्शन योजना आणण्याच्या तयारीत आहे. या योजनेत कर्मचारी, नियोक्ता, सरकार, सीएसआर निधी, गिग वर्कर्ससाठीच्या एग्रीगेटर कंपन्या तसेच अन्य स्रोतांकडूनही योगदान स्वीकारले जाणार आहे.
https://prahaar.in/2026/07/20/affordable-medicines-rush-for-the-iphone/
या योजनेतील निधी सरकारी रोखे आणि इतर सुरक्षित गुंतवणूक साधनांमध्ये गुंतवला जाईल. प्रत्येक सदस्याचे ईपीएफओच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर स्वतंत्र पेन्शन खाते असेल. या खात्यातील रक्कम नियमित योगदान आणि व्याजामुळे वाढत जाईल. ईपीएफओ ३.० अंतर्गत सदस्यांना डिजिटल डॅशबोर्ड उपलब्ध होणार असून, त्यावर योगदान, जमा निधी आणि पेन्शन उद्दिष्टाची प्रगती रिअल-टाइममध्ये पाहता येईल. तसेच निवृत्तीनंतर किती रक्कम हवी, यामध्येही बदल करता येणार आहे.
https://prahaar.in/2026/07/20/talk-of-rohits-retirement-is-captain-gill-finally-breaks-silence-on-rumors-regarding-rohits-retirement-offers-a-major-clarification/
प्रस्तावानुसार, सदस्य वयाच्या ५५ वर्षांपर्यंत या खात्याचा वापर ईपीएफप्रमाणे करू शकतील. वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर जमा झालेली लक्ष्यित सेवानिवृत्ती रक्कम (TRS) त्या वेळच्या वार्षिकी आणि व्याजदरांनुसार मासिक पेन्शनमध्ये रूपांतरित केली जाईल.
https://prahaar.in/2026/07/20/our-government-is-elected-by-the-people-we-will-decide-how-to-run-it-kangana-ranaut-strongly-criticizes-cjps-agitation/
योजनेत कौटुंबिक संरक्षणालाही महत्त्व देण्यात आले आहे. सदस्याच्या मृत्यूनंतर जोडीदार, मुले आणि अनाथांना पेन्शनचा लाभ मिळावा यासाठी स्वतंत्र ‘फॅमिली बेनिफिट फंड’ स्थापन करण्याचा सरकारचा विचार आहे.
सदस्यांना मासिक पेन्शनची रक्कम स्वतः ठरविण्याची तसेच जमा निधी वार्षिकीमध्ये रूपांतरित करण्याची किंवा सिस्टिमॅटिक विथड्रॉवल प्लॅन (SWP) द्वारे दरमहा आवश्यक तेवढी रक्कम काढण्याची मुभा असेल. कमी रक्कम काढल्यास उर्वरित मुद्दलावर व्याज मिळत राहणार आहे.