मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात भारताला २७ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. ३८८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडिया ३६० धावांवर गारद झाली. या पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल (Shubhaman Gill) याने गोलंदाजांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली. मात्र, सामन्यानंतर सर्वाधिक चर्चा झाली ती हिटमॅन रोहित शर्माच्या (Rohit Sharma) निवृत्तीबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाची यावर गिलने पहिल्यांदाच स्पष्ट भूमिका मांडली. (Shubman Gill on Rohit Sharma’s Retirement)
सामन्यानंतर पत्रकार परिषदेत शुभमन गिलला रोहित शर्माच्या भविष्याबाबत आणि सुरू असलेल्या निवृत्तीच्या चर्चांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर गिलने सांगितले की, संघात रोहित शर्माच्या निवृत्तीबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. (Shubman Gill on Rohit Sharma’s Retirement)
https://prahaar.in/2026/07/20/rohit-sharmas-historic-century-at-lords-breaks-sachins-record-too/
“आम्हाला याबाबत बोलण्याची संधीच मिळाली नाही. रोहित भाईने आम्हाला त्यांच्या भविष्याबद्दल काहीही सांगितलेले नाही. या सर्व चर्चा फक्त माध्यमांमध्ये सुरू आहेत. संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये अशा प्रकारची कोणतीही चर्चा झालेली नाही,” असे गिलने स्पष्ट केले. (Shubman Gill on Rohit Sharma’s Retirement)
त्याने पुढे सांगितले की, लॉर्ड्समधील सामना संपल्यानंतरही रोहित शर्माने आपल्या भविष्याबाबत कोणत्याही खेळाडूसोबत संवाद साधलेला नाही. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या निवृत्तीच्या चर्चांना कोणताही अधिकृत आधार नसल्याचे गिलच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले. (Shubman Gill on Rohit Sharma’s Retirement)
दरम्यान, लॉर्ड्स वनडेनंतर बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनीही रोहित शर्माच्या भवितव्याबाबत सकारात्मक संकेत दिले होते. त्यांनी म्हटले होते की, “रोहित शर्मा जसा आतापर्यंत भारतासाठी खेळत आला आहे, तसाच तो पुढेही खेळत राहील.” (Shubman Gill on Rohit Sharma’s Retirement)
https://prahaar.in/2026/07/20/ind-vs-eng-rohit-and-gills-explosive-start-at-lords-india-sets-a-new-record/
गिलच्या वक्तव्यामुळे रोहित शर्मा सध्या निवृत्तीचा विचार करत नसल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे अनुभवी फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही आगामी वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाकडून खेळताना दिसण्याची शक्यता आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील ही मालिका २७ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. (Shubman Gill on Rohit Sharma’s Retirement)
तोपर्यंत भारतीय संघ टी-२० आणि कसोटी क्रिकेटमध्ये व्यस्त असणार असून, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र, मायदेशात होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत रोहित मैदानात उतरतो का, याकडे आता क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. (Shubman Gill on Rohit Sharma’s Retirement)