जास्त आलेल्या वीज बिलाची तक्रार कशी करावी? जाणून घ्या
मुंबई : तुम्हाला माहितीये का ? जर या महिन्यात तुमचं लाईट बिल अचानक खूप जास्त आलं असेल, तर ते तसंच भरणं तुमच्या खिशाला महागात पडू शकतं! होय, जास्त आलेलं लाईट बिल तुम्ही थेट न भरता, ते चक्क कमी देखील करू शकता. कसं ?(Electricity Bill)
View this post on Instagram
https://prahaar.in/2026/07/18/nashik-unnat-nashik-abhiyan-takes-a-green-leap-fourth-phase-of-mission-green-monsoon-on-sunday/
लाईट बिल कमी करण्यासाठी भारत सरकारचा आणि वीज वितरण कंपनीचा एक अधिकृत मार्ग आहे. सगळ्यात आधी तुम्हाला ‘१९१२’ या टोल-फ्री नंबरवर कॉल करायचा आहे. कॉल लागल्यावर कस्टमर केअरला सांगा की, ‘माझं वीज बिल या महिन्यात अपेक्षेपेक्षा खूप जास्त आलं आहे, आणि मला याची तक्रार नोंदवायची आहे.'” आता लक्षात ठेवा, कॉल करण्यापूर्वी तुमच्याकडे ३ महत्त्वाच्या गोष्टी असणं गरजेचं आहे. १) तुमचा कंझ्युमर नंबर २) तुमच्या मीटरचं सध्याचं रीडिंग (तुम्ही मीटरचा फोटो काढून ठेवू शकता) ३) तुमच्या वीज बिलाची संपूर्ण माहिती. ही माहिती दिल्यावर तुमची तक्रार नोंदवली जाईल आणि तुम्हाला मेसेजद्वारे एक ‘कंप्लेंट रेफरन्स नंबर’ मिळेल. हा नंबर जपून ठेवा.
https://prahaar.in/2026/07/18/maharashtra-corona-alert-signs-of-a-covid-resurgence-48-cases-recorded-in-maharashtra-health-department-issues-an-important-warning/
“आता ही तक्रार तुम्ही नक्की कधी करू शकता? जर तुमचं घर बंद असूनही बिल जास्त आलं असेल, मीटर वेगाने पळत असेल, किंवा रीडिंग चुकीचे वाटत असेल. तक्रार नोंदवल्यानंतर ३ ते ७ दिवसांच्या आत वीज विभागाचे कर्मचारी तुमच्या घरी येऊन मीटर तपासतील. जर त्यांच्या सिस्टीममध्ये किंवा मीटरमध्ये खरंच काही चूक आढळली, तर तुमचं बिल कमी करून किंवा ॲडजस्ट करून तुम्हाला नवीन बिल दिलं जाईल.” पण समजा, एवढं करूनही तुमचा प्रश्न सुटला नाही आणि कंपनीने दाद दिली नाही, तर काय करायचं? त्यासाठी हा दुसरा उपाय म्हणजे तुम्ही थेट ‘१९०५’ किंवा खाली दिलेल्या ‘१८००-११-४०००’ या नॅशनल कंझ्युमर हेल्पलाईन वर कॉल करून तक्रार करू शकता. इथे तक्रार केल्यावर सरकारकडून थेट वीज कंपनीवर दबाव आणला जातो आणि तुमचं काम मार्गी लागतं.” ही माहिती अत्यंत महत्त्वाची आणि प्रत्येकाच्या खिशाचे पैसे वाचवणारी आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आत्ताच सेव्ह करा. तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी प्रहार न्यूजलाईनला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद!”