मुंबई : भगवान श्रीजगन्नाथांच्या पवित्र रथयात्रेचे औचित्य साधून इस्कॉन, जुहू येथे आयोजित करण्यात आलेल्या ४५ व्या वार्षिक श्रीजगन्नाथ रथयात्रा महोत्सवात राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी सहकुटुंब हजेरी लावली. यावेळी नितेश राणे यांनी सपत्नीक भगवान श्रीजगन्नाथांचे मनोभावे दर्शन घेत रथ ओढून या पवित्र सोहळ्यात सहभागी झाले. (Jaganath rath Yatra)
View this post on Instagram
https://prahaar.in/2026/07/17/rohit-sharma-bcci-will-give-pension-worth-lakhs-of-rupees-every-year-after-rohit-sharma-retired/
अंधेरी येथील श्रीजगन्नाथ मंदिरातून शनिवारी या पवित्र रथयात्रेचा भक्तिमय आणि उत्साही वातावरणात प्रारंभ झाला. ही रथयात्रा इस्कॉन, जुहू येथे संपन्न होत असून संपूर्ण परिसर भक्तिभावाने दुमदुमून गेला आहे. समता, सेवा, श्रद्धा आणि मानवतेचा एक आगळावेगळा संदेश देणारा हा उत्सव प्रत्येक नागरिकाला अध्यात्माच्या धाग्यात जोडणारा ठरला आहे. या सोहळ्याला राज्याचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्याच उपस्थितीत हा भव्य सोहळा पार पडला. यासोबतच भाजप मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांनीही या रथयात्रेत विशेष हजेरी लावली. (Nitesh Rane)
View this post on Instagram
https://prahaar.in/2026/07/18/rajarshi-shahu-maharaj-scholarship-scheme/
मंत्री नितेश राणे यांनी या सोहळ्यात सहकुटुंब उपस्थित राहून भगवान श्रीजगन्नाथांची सपत्नीक आरती केली. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी ऋतुजा राणे आणि मुलगा निमीष राणे प्रामुख्याने उपस्थित होते. राणे यांनी भगवान श्रीजगन्नाथांच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले. भगवान श्रीजगन्नाथांच्या कृपेने राज्यातील तमाम जनतेच्या आणि सर्वांच्याच जीवनात सुख, समृद्धी, सुदृढ आरोग्य लाभो आणि सर्वांची आध्यात्मिक उन्नती होवो, अशी प्रार्थना मंत्री नितेश राणे यांनी या प्रसंगी केली.