आम्ही शरद पवारांसोबत एकनिष्ठ; विलीनीकरणाबाबत कोणाशीही चर्चा नाही
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण होणार असल्याच्या आणि शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे महायुती सरकारमध्ये नवे अर्थमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात चांगलाच जोर धरला होता. मात्र, या सर्व चर्चांना खुद्द जयंत पाटील यांनी पंढरपूर येथे पूर्णविराम दिला आहे. आम्ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) जाणार नाही आणि विलीनीकरणाबाबत आमची कोणाशीही कोणतीही चर्चा सुरू नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी या बातम्या निव्वळ अफवा असल्याचे सांगितले. आम्ही सर्व जण शरद पवार यांच्यासोबत पूर्ण निष्ठेने उभे असून कार्यकर्त्यांनी मनात कोणताही संभ्रम बाळगू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.(Jayant Patil)
https://prahaar.in/2026/07/18/healthy-skin-no-need-for-expensive-creams-these-foods-will-give-your-skin-a-natural-glow/
जयंत पाटील आणि भाजपचे नेते विनोद तावडे यांची भेट, त्यापाठोपाठ ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्यातील भेट आणि नुकतीच जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची घेतलेली भेट, या वेगवान घडामोडींमुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले होते. जयंत पाटील यांच्या गळ्यात अर्थमंत्री पदाची माळ पडणार अशा बातम्याही माध्यमांमधून समोर येत होत्या. या पार्श्वभूमीवर शनिवारी पंढरपूर येथे शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या अधिवेशनासाठी आले असता जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि रंगलेल्या चर्चा फेटाळून लावल्या.
https://prahaar.in/2026/07/18/pune-jagannath-rath-yatra-2026-attention-pune-residents-traffic-diversions-on-key-roads-tomorrow-due-to-the-jagannath-rath-yatra-check-your-route-before-stepping-out/
आम्हाला एनडीएकडून कोणतेही निमंत्रण आलेले नाही आणि तिथे जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सांगत पाटील यांनी माध्यमांना टोला लगावला की, आम्ही कुठलीही स्पर्धा करत नाही, कुठले खाते मागितलेले नाही आणि कोणतीही मागणी केलेली नाही, तरीसुद्धा गेल्या दोन-तीन दिवसांत माध्यमांनी मला दोन-तीनदा अर्थमंत्री पदाची शपथ दिल्यासारखेच दिसत आहे. या वेगवेगळ्या बातम्या पाहून आमची करमणूक होत असून त्यावर वारंवार काय प्रतिक्रिया देणार, असेही ते म्हणाले.(Political News)
https://prahaar.in/2026/07/18/neet-results-2026-doubts-raised-over-neet-results-again-claim-of-700-marks-based-on-the-answer-key-yet-the-scorecard-shows-only-87-student-and-family-distraught/
महायुतीसोबत जाण्याच्या चर्चांमध्ये तथ्य नाही
पक्षाच्या विलीनीकरणाबाबत किंवा एनडीएसोबत जाण्याबाबत या क्षणापर्यंत कोणतीही चर्चा झालेली नाही. आम्ही सध्या सरकारच्या धोरणांच्या विरोधातच काम करत असून शक्तिपीठ विरोधी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठीच इथे आलो आहोत. त्यामुळे महायुतीसोबत जाण्याच्या चर्चांमध्ये काडीचेही तथ्य नाही. पक्षाचे सर्व आमदार आणि खासदार शरद पवार साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.