मुंबई : कर्जत-लोणावळा (Karjat lonavala) दरम्यानच्या मध्य रेल्वेच्या दक्षिण-पूर्व डाऊन मार्गावरील रेल्वे सेवा पूर्णपणे पूर्ववत करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बदललेल्या मार्गाने धावणाऱ्या किंवा अंशतः रद्द करण्यात आलेल्या अनेक महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्या आता पुन्हा त्यांच्या मूळ मार्गावर धावणार आहेत. मध्य रेल्वेने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. ( Central Railway)
मध्य रेल्वेच्या पथकाने 14 जुलै रोजी दक्षिण-पूर्व डाऊन मार्गिका सुरू केली. यापूर्वी 7 जुलै रोजी मध्य मार्गिका सुरू करण्यात आली होती. दोन्ही मार्ग सुरू झाल्याने रेल्वे वाहतूक आता टप्प्याटप्प्याने सुरळीत होत आहे.
https://prahaar.in/2026/07/16/i-wanted-to-kill-him-by-administering-slow-poison-who-is-the-mastermind-behind-the-secret-plot-in-the-ketan-murder-case/
17 जुलैपासून बेंगळुरू-सीएसएमटी उद्यान एक्सप्रेस आणि सोलापूर-सीएसएमटी सिद्धेश्वर एक्सप्रेस या गाड्या पुन्हा मुंबईपर्यंत धावतील. तसेच 18 जुलैपासून सीएसएमटी-बेंगळुरू उद्यान एक्सप्रेस आणि सीएसएमटी-सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेस या गाड्या पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटतील.
याशिवाय, यापूर्वी रद्द करण्यात आलेली महालक्ष्मी एक्सप्रेसही पुन्हा सुरू करण्यात आली आहे. सीएसएमटी-कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस 18 जुलैपासून, तर कोल्हापूर-सीएसएमटी महालक्ष्मी एक्सप्रेस 19 जुलैपासून मूळ मार्गावर धावणार आहे. (Train News)
अहमदाबाद-तिरुचिरापल्ली एक्सप्रेसलाही पुन्हा मूळ मार्गावरून चालवले जाणार आहे. दरम्यान, डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेस या गाड्यांची सेवा 16 जुलैपासूनच पूर्ववत करण्यात आल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे. (Railway Update)
https://prahaar.in/2026/07/16/trouble-for-siya-goyal-family-food-safety-halts-business-ketan-agarwal/
लोणावळा-कर्जत घाट विभागात दरड हटविण्याचे काम रेल्वे प्रशासनाने आव्हानात्मक परिस्थितीत पूर्ण केले. रेल्वेचे कर्मचारी कठीण भौगोलिक परिस्थितीत दिवसरात्र काम करून मार्ग वाहतुकीसाठी सुरक्षित करण्यात यशस्वी झाले. (Mahalaxmi Express)
गाड्यांच्या वेळापत्रकाबाबत अधिक माहितीसाठी प्रवाशांनी रेल्वे हेल्पलाइन किंवा एनटीईएस ॲपचा वापर करावा. तसेच मध्य रेल्वेच्या अधिकृत सोशल मीडिया माध्यमांवरही नियमित अपडेट्स दिले जात असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.