Home ब्रेकिंग न्यूज BMC : झाडांच्या छाटणी कंत्राट कामावरून उद्यान विभागाची मनसेने काढली सालटी

BMC : झाडांच्या छाटणी कंत्राट कामावरून उद्यान विभागाची मनसेने काढली सालटी

0
BMC : झाडांच्या छाटणी कंत्राट कामावरून उद्यान विभागाची मनसेने काढली सालटी

मुंबई (विशेष प्रतिनिधी)

मुंबई महापालिकेत मागील काही दिवसांमध्ये झाडांची पडझड सुरु असून वारंवारच्या झाडांच्या दुर्घटनांना महापालिका उद्यान अधिक्षकच जबाबदार असल्याचा आरोप मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला. ट्री टेक नावाच्या कंपनीने मुंबईतील झाडांचा शास्त्रोक्त सर्वे करून देण्याची तयारी दर्शवली होती. या कंपनीने महापालिका तसेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही पत्र दिले होते. पण उद्यान अधिक्षकांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्राचीही दखल घेतली नाही. त्यामुळे आजही दुघर्टना घडलेली असून आता नव्याने काढण्यात येणाऱ्या निविदेत झाडांच्या फांद्यांच्या छाटणीमध्ये आतून पोखरलेल्या झाडांमध्ये सिमेंट काँक्रिट, पॉलिथिन फोम आदी भरण्याची शिफारस केली. त्यामुळे उद्यान अधिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी मनसेने या विभागाची सालटीच काढली आहे. (BMC)

https://prahaar.in/2026/07/14/corporator-sonam-jamsutkar-organize-field-trips-for-children-to-the-municipal-corporations-dams-and-water-purification-plants/

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी महापालिका मनसे गटनेते यशवंत किल्लेदार यांच्यासह पत्रकार परिषद घेवूनही ही मागणी करताना महापालिकेच्या उद्यान विभागाचे अधिकारी पिऊन काम करत असल्याचा आरोप केला. देशपांडे यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी ही पत्रकार परिषद नसून जे अधिकारी महाराष्ट्राला बदनाम करु इच्छितात त्यांना सुतासारखे करण्यासाठी ही पत्रकार परिषद असल्याचे सांगितले. ट्री टेक या कंपनीने डिसेंबर २०२४ मध्ये महापालिका उद्यान विभागाचे उद्यान अधिक्षक यांना पत्र लिहून सर्वे करण्याची तयारी दर्शवली होती. पण या पत्रावर अधिक्षक बसून राहिले.त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनाही पत्र दिले. त्यांनी तत्कालिन आयुक्तांना पत्र पाठवले. त्यावर डू दी निडफुल असा शेरा मारला होता. पण त्यानंतरही उद्यान अधिक्षकांनी त्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही. (BMC)

आता ही दुर्घटना घडल्यानंतर पाच हजार झाडांचा सर्वे उद्यान विभागाच्यावतीने एच पश्चिम विभागातील ‘स्माईल’ स्टार्टअप अंतर्गत देण्यात आले. त्यानंतर हा निधी कमी पडल्यामुळे उपनगराचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी डिपिडीसीचा निधी वाढवून दिला. ही कंपनी झाडांचे स्कॅनिंग करून कुठले झाड आतून खराब झाले आहे, कुठल्या झाडांची मुळे कुमकुवत झाली आहे. झाडांचे आयुर्मान किती? कोणती झाडे कापली पाहिजे? कोणत्या झाडांच्या कुठल्या फांद्या कापल्या गेल्या पाहिजे आदींची माहिती या तपासणी सर्वे अहवालातून समोर येणार आहे. त्यामुळे तेव्हापासून जर हा सर्वे झाला असता आज अनेक झाडे वाचू शकली असती आणि दुर्घटना होवून लोकांचे जीव गेले नसते असे देशपांडे यांनी सांगितले. (BMC)

https://prahaar.in/2026/07/14/preeti-satam-upgrade-the-standard-of-maternity-homes-to-match-that-of-mother-and-child-hospitals/

आता जुन्या कंत्राटदारांचा कालावधी संपुष्टात आल्यामुळे नव्याने निविदा मागण्यात आल्या आहेत. यामध्ये हॉर्टीकल्चर बंधनकारक केला असून वृक्ष संगोपन तज्ज्ञ तथा आरबोर्रिस्ट कल्चर यांचा कुठेही उल्लेख नाही. यापेक्षा भयानक म्हणजे जी झाडे पोखरलेली असतील, त्यात पोकळी निर्माण झाली असतील तर त्यामध्ये सिमेंट काँक्रीट टाकले जावे, पॉलिथिन फोम आदींचा उपयोग करण्याची नमुद केले आहे. त्यामुळे उद्यान विभाग नक्की झाडे वाचवण्याचा प्रयत्न करते की मारण्याचा प्रयत्न करते असा सवाल उपस्थित करत अशा उद्यान अधिक्षकांना तात्काळ हटवले गेले पाहिजे अशी मागणी केली. (BMC)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here