मुंबई : मुंबई (Mumbai) येथील पायधुनी परिसरात अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका ७ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार (Sexual assault) झाल्याची माहिती समोर आल्यानंतर संपूर्ण परिसरात नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. इमारतीच्या वॉचमनने हे संतापजनक कृत्य केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
https://prahaar.in/2026/07/12/woman-hired-for-cleaning-steals-mangalsutra-worth-%e2%82%b93-5-lakh-thane-police-recover-it-within-an-hour/
या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून आपला निषेध नोंदवला. संतप्त झालेल्या जमावाने पायधुनी पोलीस (pydhonie police station) ठाण्याला घेराव घातला आणि आरोपीला तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. नागरिकांचा संताप इतका वाढला होता की, त्यांनी रस्त्यावर उतरून ‘रस्ता रोको’ आंदोलन सुरू केले. यावेळी आंदोलकांनी पोलीस आणि प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली, ज्यामुळे परिसरातील वातावरण कमालीचे तापले होते.
घटनेचे गांभीर्य ओळखून आणि कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने तात्काळ पावले उचलली आहेत. पोलीस ठाणे आणि संपूर्ण पायधुनी परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलीस वरिष्ठ अधिकारी नागरिकांना शांततेचे आवाहन करत आहेत. दरम्यान, पीडित चिमुरडीला तातडीने वैद्यकीय उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
https://prahaar.in/2026/07/12/shocking-brutal-murder-of-young-entrepreneur-complete-shutdown-in-shrirampur/
या संपूर्ण प्रकरणाबाबत पायधुनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. संशयित आरोपीचा शोध घेऊन त्याला कठोर कायदेशीर शिक्षा केली जाईल, असे आश्वासन पोलिसांकडून दिले जात आहे. पोलीस सध्या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असून परिसरात शांतता राखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे महिला आणि बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.