Home ब्रेकिंग न्यूज BMC Tree Planting : दहा बाधित झाडांच्या बदल्यात महापालिका लावणार २३७ झाडे

BMC Tree Planting : दहा बाधित झाडांच्या बदल्यात महापालिका लावणार २३७ झाडे

0
BMC Tree Planting : दहा बाधित झाडांच्या बदल्यात महापालिका लावणार २३७ झाडे
BMC Tree Plantation

-सचिन धानजी

मुलुंडमधील स्कायवॉकच्या बांधकामात १० झाडे बाधित

झाडे लावण्यास मुंबईत जागा नसल्याने वनविभागाकडे घेतली महापालिकेने धाव

मुंबई : मुंबई महानगरपालिकेने (BMC) हाती घेण्यात आलेल्या मलुंड टी’ विभागातील महाराणाप्रताप चौक, एल बी एस रोड येथे स्कायवॉकचे (Skywalk) काम करण्यात येणार आहे. या स्कायवॉकच्या कामामध्ये १० झाडे बाधित होत असून त्यातील ७ वृक्ष कापली जाणार आहेत. तर ३ वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. मात्र, या दहा बाधित झाडांच्या बदल्यात मुंबई महापालिकेच्यावतीने (BMC) एकूण २३८ नविन वृक्ष (Tree) लावण्यात येणार आहे.

मुंबई महापालिकेच्यावतीने मुलुंड ‘टी’ विभागातील महाराणाप्रताप चौक एल बी एस रोड येथे आकाशमार्गिका अर्थात स्कायवॉकचे बांधकाम करण्यात येत आहे. या स्कायवॉकच्या कामासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आलेली असून या स्कायवॉकच्या बांधकामासाठी सुमारे २५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. परंतु या स्कायवॉकच्या बांधकामाला सुरुवात करण्यापूर्वी केलेल्या सर्वेक्षणमध्ये एकूण १० वृक्ष बाधित होत असल्याचे दिसून आले. यामध्ये ७ वृक्ष कापणे, ३ वृक्षांची पुनर्रोपण करणे तसेच ५ झाडे आहे तिथे ठेवण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने मंजुरी दिल्यानंतर आता ही झाडे कापण्याची कार्यवाही सुरु करण्यात येत आहे. या दहा बाधित झाडांच्या बदल्यात एकूण २३८ नविन वृक्ष लावण्याचे महापालिकेने नमुद केल आहे.

https://prahaar.in/2026/07/12/mumbai-tree-collapse-road-engineers-to-also-keep-an-eye-on-the-area-around-tree-roots/

परंतु सध्यस्थितीत, उ‌द्यान विभागाच्या परवानगी मध्ये नमूद केल्या प्रमाणे २३८ नवीन वृक्षांची लागवड करण्याकरिता व ३ वृक्ष पुनर्रोपण करण्याकरिता जागा उपलब्ध नसल्या कारणाने, विभागीय व्यवस्थापक, महाराष्ट्र वन विकास महामंडळ म.” यांना जागा उपलब्ध करून देण्याकरिता विचारणा करण्यात आली आहे. त्यांनी यासाठी तयारी दर्शवली असून वृक्षलागवड (Tree Plantation) तथा वृक्ष पुनर्रोपण तसेच वृक्ष तोडणी करण्याकरिता एकूण रक्कम. २४.९५ लाख रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. त्यानुसार हा निधी महाराष्ट्र वन विकास महामंडळ यांना देण्यात येणार आहे. हा निधी उपलब्ध करून दिल्यानंतर महामंडळाच्यावतीने पनवेल रेंज मधील वडघर येथील ०.२१ हेक्टर जागेवर या २३८ झाडांची लागवड केली जाणार आहे. तसेच या वृक्ष लागवड व ७ वर्ष संगोपन ही कामे वन विभागाच्यावतीने केली जाणार आहे. यामध्ये २३८ वृक्ष लागवड आणि सात वर्षांचे संगोपन याकरता २१.१ ६ लाख रुपये, ३ वृक्षांचे पुनर्रोपण करून १ वर्ष संगोपन करणे याकरिता रक्कम रु.१लाख ९८ हजार रुपये, ७ वृक्षांचे वृक्षतोड करण्याकरिता १ लाख ८० हजार रुपये आदींचा यामध्ये समावेश असल्याचे पूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here