Home ब्रेकिंग न्यूज Mumbai Tree Collapse : झाडांच्या मुळांभोवतीही असणार रस्ते अभियंत्याची नजर

Mumbai Tree Collapse : झाडांच्या मुळांभोवतीही असणार रस्ते अभियंत्याची नजर

0
Mumbai Tree Collapse : झाडांच्या मुळांभोवतीही असणार रस्ते अभियंत्याची नजर
BMC Tree

महापालिकेने केले परिपत्रक जारी

मुंबई : मुंबईत (Mumbai) मागील काही दिवसांमध्ये झाडे पडून झालेल्या दुघर्टनांची गंभीर दखल घेण्यात आली असून आता रस्त्याच्या शेजारी असलेल्या प्रत्येका झाडांची मुळे खुली करून एक बाय एक मीटरची जागा मोकळी ठेवण्याची जबाबदारी रस्ते अभियंता यांच्यावर सोपवली आहे. प्रत्येक रस्त्यांसाठी नेमलेल्या रोड इंजिनिअरलाच (Road Engineer) आता रस्त्याकडेला असणाऱ्या झाडांच्या भोवतीची जागा मोकळी करून घेण्यास भाग पाडले जाणार आहे. याबाबतचे निर्देश देण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.

मुंबईतील पावसाळ्यातील (Rain) दुघर्टनांबाबत आयोजित तातडीच्या सभेत प्रशासनाच्यावतीने उत्तर देताना अतिरिक्त आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी या दुघर्टनांमध्ये मृत्यू पावलेल्यांबाबत संवेदना व्यक्त केल्या. तसेच मुंबईत सध्या ३० लाख झाडे असून त्यातील १ लाख ८५ हजार झाडे ही रस्त्याच्या कडेला आहे. तर १० लाख झाडे शासकीय जमिनींवर तसेच १५.५० लाख झाडे ही खासगी जमिन तथा सोसायट्यांमध्ये आहे. सध्या या सर्व झाडांचा सर्वेचे काम हाती घेण्यात आले असून लवकरच हा सर्वे पूर्ण होईल.त्यात दहा टक्के झाडे वाढली जावून ती ४० लाखांपर्यंत जातील असा विश्वास व्यक्त केला.

https://prahaar.in/2026/07/11/routes-of-some-trains-changed-until-july-17-2026-due-to-a-landslide-on-the-lonavala-karjat-route/

तर मागील १ जुलै ते ०८ जुलै २०२६ या कालावधीमध्ये मुंबईत मोठा पाऊस (Heavy Rain) पडला असून मुंबइच्या वार्षिक पावसाच्या तुलनेत २७ टक्के तर दिल्लीत (Delhi) वार्षिक ८०० मि.मी पाऊस पडतो, त्यांच्या ११७ टक्के, पूण्याच्या वार्षिक पावसाच्या ११३ मि.मी पाऊस पडला. तसेच जुलैमध्ये याच कालावधीत समुद्राला ४ मीटरपेक्षा मोठ्या भरती आल्या होत्या.

जुलै महिन्यातील या पहिल्या आठ दिवसांच्या कालावधीमध्ये २ हजार ६९३ झाडांच्या फांद्या तसेच झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. झाडांची मुळे सिमेंट काँक्रीटीकरणामुळे बंदिस्त झाल्यास झाडांना पाण्याचा पुरवठा होत नाही. त्यामुळे रस्त्या लगतची जेवढी म्हणून झाडे आहेत त्या रस्त्यावरील झाडांच्या मुळे जर सिमेंट कांक्रिटने बंदिस्त झाली असतील तर ती मुळे खुली करून घेण्याची जबाबदारी रस्ते अभियंता यांच्यावर सोपवण्यात आली आहे. मागील ३ जुलै २०२६ रोजी याबाबतचे परिपत्रक आयुक्तांनी जारी करत हे निर्देश दिले आहेत. त्यानुसार रस्ते अभियंत्यांवरच ही जबाबदारी सोपवल्यामुळे त्यांच्या माध्यमातनू रस्त्यालगतच्या झाडांची मुळे मोकळी करून घेण्याचा प्रयत्न केला जाईल. प्रत्येक झाडांच्या भोवती एक बाय एक मीटरची जागा मोकळी सोडण्याचा प्रयत्न केला जाईल.

वृक्ष प्राधिकरणांच्या तज्ज्ञ समितीची नेमणूक

मुंबईत पावसाळ्या झाडांच होणारी पडझड, झाडांच्या फांद्यांची शास्त्रोक्त छाटणी, मृत झाडांची कापणी, तसेच झाडांचा रखरखाव याबाबत वृक्ष प्राधिकरणामार्फत तज्ज्ञ समितीची नेमणूक करण्यात आली आहे. या समितीच्या अहवालातील शिफारशीनुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे. यामध्ये विशिष्ट प्रकारच्या झाडांची लागवड तसेच दहा फुटांपर्यंत वाढणार नाही अशा झाडांची लागवड आदींचा विचार करता झाडांची देखभाल योग्यप्रकारे कशाप्रकारे होईल आणि त्यांची पडझड होणार नाही याचा विचार करून पुढील अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला जाईल असेही डॉ. विपीन शर्मा यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here