Home ब्रेकिंग न्यूज Dahisar News : खाडीत पोहण्यासाठी गेलैल्या दोन विद्यार्थ्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू ; दहिसरमध्ये धक्कादायक प्रकार..

Dahisar News : खाडीत पोहण्यासाठी गेलैल्या दोन विद्यार्थ्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू ; दहिसरमध्ये धक्कादायक प्रकार..

0
Dahisar News : खाडीत पोहण्यासाठी गेलैल्या दोन विद्यार्थ्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू ; दहिसरमध्ये धक्कादायक प्रकार..
dahisar

दहिसर(Dahisar) : मुंबईतील दहिसर पूर्व येथील केतकीपाडा परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या परिसरातील खदानीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा पाण्यात गुदमरुन दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पीयूष गुप्ता (वय 19) आणि ओम अंकुश सिंह (वय19) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. पीयूष कांदिवली आणि ओम अंधेरी मध्ये राहत होते. मित्रांसोबत ते खदानीत पोहण्यासाठी आले होते त्यांच्या सोबत अमन गिरी आणि दिवेश पटेल हे दोघेही पोहोण्यासाठी गेले होते. मृत विद्यार्थ्यांपैकी एक यापूर्वीही या खदानीत आला होता आणि त्यानेच इतर तिघांना येथे आणल्याचे समोर आले आहे.(Dahisar East)

https://prahaar.in/2026/07/11/maharashtra-ats-raids-suspicion-of-links-to-a-pakistani-social-media-network-maharashtra-ats-conducts-a-major-operation-questioning-112-individuals/

दोन दिवसाचं नियोजन पडलं महागात ;
या चौघांनी दोन दिवसांपूर्वीच पोहण्यासाठी येथे येण्याचे नियोजन केले होते. धक्कादायक म्हणजे खदानीत उतरण्यापूर्वी मद्यपान केले होते. वारंवार प्रशासनाकडून या ठिकाणी न येण्याचे आवाहन केले जाते तरी या ठिकाणी वेगवेगळ्या मार्गाने मुले पोहण्याकरिता या ठिकाणी येत असतात. खदान परिसरात मद्यपान केल्यानंतर पोहण्यासाठी पाण्यात उतरल्याने ही दुर्घटना घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

https://prahaar.in/2026/07/11/ahilyanagarats-raids-shrirampur-at-dawn/

या ठिकाणी येण्यासाठी प्रशासनाने सक्तीची बंदी घातली आहे. तरीही या सूचनांकडे दुर्लक्ष केलं जातंय. घटनेची माहिती मिळताच दहिसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दहिसर पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे दहिसर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलीस या परिसरात चांगला बंदोबस्त ठेवला आहे आणि परिसरातील नागरिकांना सूचना दिली आहे कि या परिसरात कोणी पोहण्यासाठी आलेलं दिसलं तर तात्काळ पोलीस प्रशासनाला संपर्क साधा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here