Home देश Mahadev Betting App : महादेव ॲप सट्टेबाजी प्रकरणी सीबीआयकडून ११ आरोपपत्रे दाखल

Mahadev Betting App : महादेव ॲप सट्टेबाजी प्रकरणी सीबीआयकडून ११ आरोपपत्रे दाखल

0
Mahadev Betting App : महादेव ॲप सट्टेबाजी प्रकरणी सीबीआयकडून ११ आरोपपत्रे दाखल
mahadev beeting aap

वी दिल्ली: महादेव ॲप ऑनलाइन सट्टेबाजी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने गुरुवारी एक मोठी कारवाई करत न्यायालयात ११ आरोपपत्रे दाखल केली आहेत. यामध्ये भ्रष्टाचाराशी संबंधित सहा, तर बेकायदेशीर सट्टेबाजी नेटवर्कशी संबंधित पाच आरोपपत्रांचा समावेश आहे. या कारवाईमुळे सट्टेबाजी सिंडिकेटच्या तपासाला मोठा वेग आला आहे. असीम दास, रोहित गुलाटी, विकास छापडिया, अनिल धम्मानी, विशाल आहुजा आणि धीरज आहुजा यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा व आयपीसीच्या(IPC) विविध कलमांतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांच्या विरोधात सीबीआयने अतिरिक्त पुरावे सादर केले आहेत.

https://prahaar.in/2026/07/09/action-taken-against-noble-hospital-pharmacy-following-notice-of-a-video-featuring-sairat-fame-arbaz-shaikh/

दुसऱ्या प्रकरणात सौरभ चंद्राकर, रवी उप्पल आणि सट्टेबाजी सिंडिकेटच्या विविध पॅनेलच्या ६६ सदस्यांविरुद्ध ५ आरोपपत्रे दाखल करण्यात आली आहेत. यामध्ये आयपीसी आणि छत्तीसगड जुगार प्रतिबंधक कायद्याचा वापर करण्यात आला आहे. सीबीआयच्या तपासात उघड झाले आहे की, सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल हे परदेशातून हे रॅकेट चालवत होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून देशभरातील लाखो वापरकर्त्यांना त्यांनी या सट्टेबाजीच्या जाळ्यात ओढले होते. सट्टेबाजीद्वारे मिळालेला काळा पैसा ‘म्युल’ बँक खात्यांच्या माध्यमातून परदेशात वळवून त्याचे मनी लाँड्रिंग(Money Launderin) केले जात होते. तसेच, या बेकायदेशीर धंद्याला अभय देण्यासाठी काही सरकारी कर्मचाऱ्यांना ‘प्रोटेक्शन मनी’ म्हणून लाच दिली जात असल्याचा गंभीर आरोपही सीबीआयने केला आहे.

https://prahaar.in/2026/07/09/nitesh-rane-positive-efforts-towards-setting-up-a-fishing-cluster-in-jalgaon-jamod-assurance-from-minister-nitesh-rane/

सिंडिकेटचे प्रमुख आणि अनेक सहकारी काही वर्षांपूर्वीच पश्चिम आशियातील देशांत पळून गेले आहेत. यातील ४ मुख्य आरोपींविरुद्ध ‘रेड कॉर्नर नोटीस’ जारी करण्यात आली असून, त्यांना ‘फरारी आर्थिक गुन्हेगार’ घोषित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या सट्टेबाजी सिंडिकेटचा संपूर्ण विस्तार, त्यांचे आर्थिक धागेदोरे आणि याला लाभलेले कथित राजकीय व प्रशासकीय पाठबळ शोधण्यासाठी सीबीआयचा तपास सुरू आहे. येणाऱ्या काळात आणखी आरोपपत्रे दाखल होण्याची दाट शक्यता सीबीआयने व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here