Nashik : नाशिक शहर आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर, वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणची संपूर्ण यंत्रणा आणि कर्मचारी युद्धपातळीवर कार्यरत आहेत. जोरदार पावसामुळे किंवा वादळामुळे वीज यंत्रणेला फटका बसल्यास, ग्राहकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी महावितरणने विविध पर्याय आणि हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. यासोबतच तातडीच्या परिस्थितीत नाशिक शहरात महावितरणशी संपर्क करण्यासाठी शाखानिहाय संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी संयम राखून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
मुसळधार पावसामुळे झाडे व फांद्या पडणे, वीज खांब कोसळणे किंवा तारा तुटणे अशा घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता, अशा प्रसंगी तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येक विभागात पथक तयार ठेवण्याच्या सूचना देऊन आपत्कालीन परिस्थितीत जलद प्रतिसाद देण्याची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
महावितरणकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, वीज वाहिन्या किंवा तुटलेल्या तारांपासून सुरक्षित अंतर ठेवावे व वीज पुरवठा खंडित झाल्यावर कोणतीही अडचण आढळल्यास तक्रार देण्यासाठी शहरी व ग्रामीण भागातील वीज ग्राहकांसाठी २४ तास सुरु असणार्या मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे १९१२ किंवा १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ हे तीन टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहेत. यासह महावितरणचे अँप, संकेतस्थळ तसेच नोंदणीकृत मोबाईलवरून महावितरणच्या ०२२-५०८९७१०० या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यास तक्रार नोंदविली जाईल. तसेच आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नाशिक शहरातील तक्रार निवारण केंद्राशी संपर्क साधावा. वीज पुरवठा खंडित झाल्यास थोडा वेळ वाट बघून संपर्क करावा व संयम राखावा असे आवाहन महावितरणने केले आहे.
https://prahaar.in/2026/07/08/heavy-rain-warning-for-nashik-district/
नाशिक शहरातील शहर एक व दोन या विभागांतर्गत असणारे शाखा कार्यालयाचे संपर्क क्रमांक
नाशिक शहर विभाग क्र. १
कक्षाचे नाव व तक्रार निवारण क्रमांक, कक्षांतर्गत भाग व परिसर
शहर उपविभाग
1. भद्रकाली कक्ष २ – 7875766437 : शालिमार, बॉम्बे नाका, डॉ. आंबेडकर पुतळा, अण्णाभाऊ साठे चौक, गंजमाळ, भीमवाडी, एन डी पटेल रोड, सिंगाडा तलाव , गुरुद्वारा रोड, कालिका माता मंदिर, गडकरी चौक,
2. भद्रकाली कक्ष ३ – 7875766438 : आरके चौक, धुमाळ पॉइंट, भद्रकाली, सारडा सर्कल, दूध बाजार, दही पूल, कानडे मारुती लेन, सराफ बाजार, भांडी बाजार, फाळके रोड, स्लॉटर हाऊस, भद्रकाली पोलीस स्टेशन, गाडगे, महाराज पुतला, म्हसरूळ टेक, बुधा हलवाई, तेली गल्ली, गायधनी गल्ली, बोहर पट्टी, चंदीचा गणपती, खरे सदन, गोरे राम कॉम्प्लेक्स, भाजी मार्केट, फ्रूट मार्केट, पिंजरघाट, मोठी दर्गा, तांबट लेन, साक्षी गणपंती, नवा दरवाजा, भद्रकाली मंदिर
3. द्वारका कक्ष १ – 7875766439 : ट्रॅक्टर हाऊस, नानवली, फकीर वाडी, शिवाजी चौक, टिक पुरी, पाटील गल्ली, बुधवार पेठ, रंगार वाडा, काझीपुरा, मुलतान पुरा, कोकणी पुरा, वॉटर ग्रेस, अमरधाम, काझी गढी, कुंभार वाडा, मोदकेश्वर, मधली होडी, आसरा ची वेस, निवृत्ती कॉम्प्लेक्स, झाकीर हुसेन हॉस्पीटल, कथडा, भगवान पुरा, मोठा राजवाडा, आझाद चौक, चौक मंडई, बेले गल्ली, नागसेन वाडी रेणुका नगर, वाणी हाऊस, आझाद नगर
4. डी. जे. पार्क कक्ष २ – 7875766435 : गोळे कॉलनी, शरणपूर रोड, केटीएचएम कॉलेज, केव्हीएन नाईक, डोंगरे वसतिगृह
5. डी. जे. पार्क कक्ष १ – 7875766434 : सीबीएस, जिल्हा न्यायालय, तिडके कॉलनी
6. भद्रकाली कक्ष १ – 7875766436 : मेन रोड,एमजी रोड.आरके,पंचवटी हॉटेल,यशवंत व्यायाम शाळा,नेहरू गार्डन,महाराष्ट्र बँक,एचडीएफसी बँक,आंबेडकर कॉलनी,आशोक स्तंभ,घरपुरे घाट
पंचवटी उपविभाग
7. मखमालबाद नाका कक्ष – 7875687176 : मखमलाबाद नाका.हनुमानवाडी,रामवाडी,मखमलाबाद रोड,आरटीओ ऑफिस,नवीन मार्केट यार्ड,तुळजा भवानी नगर,मधुबन कॉलनी,जाधव माळा,मोरे माळा, फाडोळ माळा,शिंदे नगर
8. तपोवन कक्ष – 7875687257 : तपोवन, औदुंबर रोड, हनुमान नगर, बिडी कामगार नगर, दिगंबर नगर, गंगोत्री नगर, सुर्यवंशी नगर, मगर माळा, निलगिरी बाग, कैलाश नगर, टकले माळा, कृष्णा नगर, चव्हाण मळा,शिंदे मळा, लोहकरे मळा, स्वामी नारायण नगर, गणेश वाडी, के.के.वाघ कॉलेज, कपिला संगम,लक्ष्मी नगर,दुर्गा नगर,जनार्धन आश्रम,जेजुरकर मळा
9. आडगाव नाका कक्ष – 7875687163 : हिरावाडी, धात्रक फाटा, कमल नगर, ओम नगर, ठाकरे माला, सिद्धिविनायक टाऊनशिप, मेरी रास बिहारी लिंक रोड, जनार्दन स्वामी नगर, साईनगर, विजयनगर, बळी मंदिर, बळी राजा नगर, औदुंबर नगर, त्रिकोणी बंगला, जोशी वाडा, तांबोळी नगर, शक्ति नगर
10. पंचवटी कक्ष – 7875766473 : पंचवटी, रामकुंड, इंदिरा कुंड, निमाणी, काळाराम मंदिर, माळवावे चौक, शनी चौक, मालेगाव स्टॉप, चिंचबन, नाग चौक, संजय नगर, वाल्मिकी नगर, पंचवटी कारंजा, येरंडवाडी
11. मार्केट यार्ड कक्ष – 7875687954 : फुले नगर, भराडवाडी, हाऊसिंग कॉलनी, दत्तनगर, दिंडोरी नाका, पेठरोड, कालिका नगर, मायको हॉस्पिटल, महावीर नगर, रोहिणी नगर, सुदर्शन कॉलनी, राहल वाडी, सम्राट नगर, शिव नगर, तारवाला नगर, विद्युत नगर, गजानन चौक.
12. दिंडोरी रोड कक्ष -7875687103 : दिंडोरी रोड, मेरी म्हसरूळ, एकता नगर, म्हसरूळ लिंक रोड, गायत्री नगर, बोरगड, गजपथ कॉलनी, गुलमोहर नगर, प्रभात नगर, पोकर कॉलनी, भादा कॉलनी, महावीर कॉलेज
सातपूर उपविभाग
13. गंगापूर रोड कक्ष – 7875766442 : जुना गंगापूर नाका, विद्या विकास सर्कल, प्रसाद सर्कल, शाहिद सर्कल, थत्ते नगर, बीके नगर, सहदेव नगर, माणिक नगर, पंपिंग स्टेशन रोड, केबीटी सर्कल, प्रमोद नगर, नरसिंह नगर, नेर्लेकर सर्कल, शांतिनिकेतन चौक, कॉलेज रोड.
14. त्र्यंबक रोड कक्ष – 7875766443 : शरणपूर रोड, त्रंबक रोड, उंटवाडी रोड, सिटी सेंटर मॉल परीसर, संभाजी चौक परिसर, कृषी नगर, पारिजात नगर, कल्पना नगर, कॉलेज रोड, बारा बंगला परीसर.
15 – एमआयडीसी कक्ष – 7875766447 : सातपूर एमआयडीसी परिसर, प्रबुधा नगर, संतोषी माता नगर, आयटीआय सिग्नल
16- सावरकर नगर कक्ष – 7875766446 : महात्मा नगर, सावरकर नगर, एबीबी सर्कल, भोसला मिलिटरी स्कूल, जेहान सर्कल ते गुरुजी हॉस्पिटल आणि संत कबीर नगर.
17. एमएचबी कक्ष – 7875766445 : गणेश नगर, कामगार नगर, काळे नगर, पाइपलाइन रोड, गुलमोहर कॉलनी, वनविहार कॉलनी, सातपूर कॉलनी.
सिडको उपविभाग
18 सिडको ५ वी स्कीम कक्ष – 7875686235 : पाटील नगर, पंडित नगर, बुद्ध विहार, भाद्रपद सेक्टर, मालपाणी चौक, साई बाबा नगर, उत्तम नगर, दौलत नगर, राजरत्न नगर
19. गणेश चौक कक्ष – 7875766457 : गोविंद नगर, प्रकाश पेट्रोल पंप परिसर, सद्गुरू नगर, भुजबळ फार्म, बदादे नगर, सदाशिव नगर, पांगारे मळा, लेखा नगर, महाराणाप्रताप चौक, सागर गोड, पिंपरीकर रुग्णालय परिसर.
20. सिडको ४ थी स्कीम कक्ष – 7875766459 : पेठे हायस्कूल, सावतानगर, खांदे मळा, पवननगर, तोरणा नगर, आनंद नगर, साईबाबा नगर, लोकमान्य नगर, उदय कॉलनी, शिवशक्ती चौक, त्रिमूर्ती चौक, डॉ. हेडगेवार नगर, मोती चौक, सूर्योदय कॉलनी
21. आश्विन नगर कक्ष – 7875766463 : आश्विंग नगर, संकेत नगर, मोरवाडी, दत्त चौक, मटन मार्केट, स्वामी विवेकानंद नगर, राणे नगर, एन-३२, एन-३४, एन-३१, विजय नगर स्टॉप, पेलिकन पार्क, मोरवाडी स्मशानभूमी, बजरंग चौक, हनुमान चौक, महाले फार्म, आर्यवत.
22. अंबड एमआयडीसी कक्ष – 7875766465 : अंबड एमआयडीसी परिसर, झोलो पॉईंट, गरवारे पॉइंट, साठे नगर, रमाबाई नगर, दातीर मळा
नाशिक शहर विभाग क्र. २
कक्षाचे नाव व तक्रार निवारण क्रमांक, कक्षांतर्गत भाग व परिसर
नाशिकरोड शहर (O&M) उपविभाग
१. आडगाव कक्ष – 9607440412 : आडगाव , आडगाव शिवार, जत्रा हॉटेल, नांदूरनाका, माडसांगवी, राऊतवस्ती, विंचूर गवळी
जेलरोड कक्ष – 7875604289 : सैलानी बाबा, दसक, महालक्ष्मी नगर, सम्राट अशोक नगर, नारायणबापू नगर, आढावनगर, खर्जूल मळा, तिरुपती नगर, गोसावी मळा, मंगलमूर्ती नगर, सप्ताशृगी नगर, करंजकर नगर, पंचक गाव शनिमंदीर, राजराजेश्वरी नगर, नरहरी नगर मोरेमळा भैरवनाथ नगर, द्वारका नगर, साईनाथ नगर, राहूलनगर
पॉवर हाऊस कक्ष १ – 7875623745 : बिटको रुग्णालय परीसर, गोसावी वाडी, रेल्वे स्टेशन, देवीचौक, कोर्ट परीसर, गायकवाड मळा, रेजिमेन्टल प्लाझा, बिटको चौक, चेहडी, सामनगाव रोड, खर्जूल मळा, शिखरेवाडी, गंधर्वनगरी, नवलेचाळ, स्टेशनरोड, डावखर वाडी
पॉवर हाऊस कक्ष २ – 7875602498 : माळी कॉलनी, विद्यानगरी, गोरेवाडी, सानेगुरुजी नगर, कलानगर, एम. एस.ई.बी. कॉलनी, सावरकर नगर, गोदावरी सोसायटी 1/2, भिमनगर, इंदिरानगर, आम्रपाली, श्रमीकनगर, त्रिवेणी पार्क, जिजामाता नगर, ख्रिश्चन कॉलनी.
उपनगर कक्ष – 7875688624 : समता नगर, उपनगर, आर्टीलरी रोड, नाशिकरोड, एनएमसी, गांधीनगर, डिजीपी नगर, इच्छामणी, मनोहर गार्डन, आशर इस्टेट, आगार टाकळी शिवार,शांती पार्क, महारूद्र कॉलनी, टागोर नगर,
देवळाली गांव कक्ष 7875689233 : देवळाली गाव, जय भवानी रोड, सौभाग्य नगर आर्टीलरी रोड, डावखर वाडी, रोकडोबा वाडी, फ़र्नांडीस वाडी, मालधक्का रोड, विहीतगाव, जगतापमाळा, आनंदनगर, भालेराव मळा, मुक्तीधाम मंदिर मागील परिसर.
देवळाली कॅम्प कक्ष 7875603558 : देवळाली कैंप, बेलतगव्हाण, संसारी गाव, शिंगवे बहूला, चारणवाडी, बालगृह रोड, लॅमरोड, हाडोळा ,
भगुर शहर कक्ष 7875440107 : भगूर गाव, विजय नगर, ब्रान्स स्कूल, लहवित रोड, नानेगाव रोड,
पाथर्डी (O&M) उपविभाग
2 द्वारका २ कक्ष 7875602807 : द्वारका, पखाल रोड, वडाळा रोड, तपोवन रोड, बोधले नगर, बनकर चौक, त्रिकोण गार्डन
इंदिरानगर कक्ष 7875624813
भारतनगर, शिवाजी वाडी, छान हॉटेल, रथचक्र सोसायटी, वंदना पार्क, परत नगर, बजरंग सोसायटी, हरीसृष्टी, साईनाथ सिग्नल, सिटी गार्डन, कलानगर, गजानन महाराज, मंदीर रोड, रहनुमा नगर, रोझी हॉटेल
अशोकामार्ग कक्ष 7875440346
अशोकामार्ग, रविशंकर मार्ग, बोधले नगर, वडाळा गाव, बाबा नगर, पखाल रोड, कुबा मशीद, गुलशन नगर, मेहबूब सोसायटी, रहेमतनगर, सह्याद्री हॉस्पीटल , मिरजकर नगर, भाभा नगर, एस एन पार्क 1/2, खोडे नगर, गणेश नगर,मदिना नगर, व्हाईट लीली स्कूल
पाथर्डी कक्ष 7875760678
पाथर्डी गाव , दामोदर चौक, नरहरी नगर, माधव नगर, इनकम टॅक्स कॉलनी,
विल्होळी कक्ष 7875440345
विल्होळी गाव, गवळाणे, राजूर बहूला, राजूर पिंपळस, प्रशांत नगर, मुरलीधर नगर खंडेराव नगर, स्वामी समर्थ नगर
राणेनगर कक्ष 7875605427
राणेनगर, वासननगर, चेतना नगर, आव्हाड चौक, सोनवणे मळा, जायभाय नगर समर्थ नगर, शरयू नगर, पार्थ साईड, मेट्रो रोड,
राजीवनगर कक्ष 7875440318
पांडवनगरी, शृध्दाविहार, पाटील गार्डन, कलानगर सिग्नल, सदिच्छा नगर, राजीवनगर, चार्वक चौक, शिव कॉलनी अश्वमेघ कॉलनी, डे केअर शाळा, रथचक्र चौक,
गंगापूर उपविभाग
3. गंगापूर कक्ष 7030944087
ग़ंगापूर गाव, सावरगाव, शिवाजीनगर, सिरीन मिंडोज, सोमेश्वर कॉलनी, आनंदवल्ली, जलालपूर, महादेवपूर, धर्माजी कॉलनी ,
मखमलाबाद कक्ष 7875690074
मखमलाबाद गाव, पेठरोड, चांदशी, मुंगसरा, दरी मातोरी, जलालपूर शिवार,
सातपूर कक्ष 7875610504
सातपूर गाव, श्रमिकनगर, अशोकनगर, बालाजी पार्क, जय गणेश कॉलनी, दत्तराज नगर, श्रीकृष्ण नगर, गूळेवाडी, राधाकृष्ण नगर, गंगानगर, शिवाजी नगर
कामठवाडा कक्ष 7875600876
कामठवाडा, कार्तीकी नगर, भावरे नगर, डिजीपी नगर2, खुटवड नगर, अभियंता नगर
दातिर नगर कक्ष 7875440339
दातीरमळा फ़डोळमाळा , अतुलडेअरी, उपेंद्र नगर, महाजन नगर नवनाथ नगर, शुभम पार्क