– रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून मंजुरीचे पत्र
मुंबई : कोकण रेल्वेवरील प्रवाशांसाठी आणि विशेषतः दक्षिण कोकणातील नागरिकांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशनवर आता ‘राजधानी एक्सप्रेस’ आणि ‘गरीब रथ’ यांसारख्या अतिवेगवान आणि महत्त्वाच्या ३ लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या थांब्यांसाठी अधिकृत मंजुरी दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. या निर्णयामुळे कोकणची रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार असून, आगामी काळात येथील पर्यटन व्यवसायाला आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा बुस्ट मिळणार आहे.
https://prahaar.in/2026/07/08/devendra-fadnavis-%e2%82%b913000-crore-plan-for-mumbais-flood-control-chief-ministers-announcement/
मुख्यमंत्र्यांनी २५ मार्च २०२६ रोजी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहून जनसुविधेसाठी सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशनवर महत्त्वाच्या गाड्यांना थांबा देण्याची मागणी केली होती. या पत्राची दखल घेत रेल्वे मंत्रालयाने ७ जुलै २०२६ रोजी या मागण्यांना मंजुरी देणारे पत्र जारी केले आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुख्यमंत्र्यांना (Devendra Fadnavis) पाठवलेल्या पत्रात नमूद केल्यानुसार, आता सावंतवाडी रोड स्टेशनवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मंगळुरू एक्सप्रेस, तिरुवनंतपुरम सेंट्रल – हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) – तिरुवनंतपुरम उत्तर (कोच्छुवेली) गरीब रथ एक्सप्रेस या गाड्या थांबणार आहेत.