दुकानावर पडलेल्या झाडाखाली अडकल्याने एकाचा मृत्यू
मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबईत झाड कोसळण्याच्या (Tree collaps) घटना सुरूच आहेत. रविवारी दुपारी कुर्ला (पश्चिम) येथील नौपाडा परिसरात दुकानावर झाड कोसळून ६३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला.
ही घटना ५ जुलै रोजी दुपारी सुमारे १२.४० वाजण्याच्या सुमारास घडली. नौपाडा येथील हिंदी बीएमसी शाळेजवळ, गोम्स गाऊन इमारतीसमोर एका दुकानावर मोठे झाड कोसळले. या दुर्घटनेत एक व्यक्ती गंभीर जखमी झाली. (Kurla News)
https://prahaar.in/2026/07/04/aamir-khan-and-gauri-spratts-private-wedding-ceremony-only-100-to-150-guests-invited-those-two-close-friends-in-the-spotlight/
घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस, बेस्ट आणि संबंधित विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जखमी व्यक्तीला तातडीने फौझिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Heavy rain)
रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, युनूस कुंदावाला (वय ६३) यांना रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले.
या घटनेनंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. झाड हटवून परिसर सुरक्षित करण्याचे काम संबंधित यंत्रणांकडून करण्यात आले.
https://prahaar.in/2026/07/05/over-100-tourists-stranded-at-khopolis-zenith-waterfall-all-safely-rescued-after-a-three-hour-operation/
दरम्यान, पावसाळ्यात झाड कोसळण्याच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे आणि आवश्यक नसल्यास मोठ्या झाडांच्या परिसरात थांबणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मागील आठवड्यात चेंबुर येथील एका शाळेच्या बसवर झाड कोसळले होते. या दुर्घटनेत ११ वर्षाच्या विद्यार्थ्याने प्राण गमावले होते.