Home ब्रेकिंग न्यूज Mumbai Rains : मुंबईत पावसाची बेबंदशाही…

Mumbai Rains : मुंबईत पावसाची बेबंदशाही…

0
Mumbai Rains : मुंबईत पावसाची बेबंदशाही…
Mumbai Heavy Rain

दिवसभर कोसळधार, मुंबईला लोटले पाण्याखाली

मुंबई : मध्यरात्रीपासून मुंबईत (Mumbai) मुसळधार कोसळत पावसाने (Rain) आपली बेबंदशाही गाजवली. दिवसभर कोसळधार सुरूच राहिल्याने मुंबईत उपनगरातील ईशान्य मुंबई आणि पश्चिम उपनगरातील मालाड, गोरेगाव, अंधेरी पश्चिम आदी परिसर पूर्णपणे पाण्याखाली लोटले गेले.
उपनगरात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत नाबाद शतकी खेळी करत द्विशतकच्या दिशेने मिलिमीटर पावसाची नोंद केली. भांडुप पश्चिम एल बी एस मार्गावरील बांधकाम सुरू असलेल्या भागालगतचा रस्त्याचा भाग कोसळणे आणि गोवंडी बैगनवाडी येथील घराचा भाग कोसळून दोन जखमी झाले याव्यतिरिक्त अनेक ठिकाणी झाडे उन्मळून आणि फांद्या तुटून पडण्याच्या घटना घडल्या.

भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगराला अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना आज दिनांक ४ जुलै २०२६ रोजी दुपारच्या सत्रा सुटी जाहीर करण्यात आली आहे. आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, महापौर रितू तावडे आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी आपत्कालीन नियंत्रण कक्षात जाऊन मुंबईतील विविध भागातील परिस्थितीचा आढावा अधिकाऱ्यांसह घेतला.

सरासरी पाऊसः सकाळी ०८ ते रात्री ८ वाजेपर्यंत

शहर- १२९ मि. मी

पूर्व उपनगरे: १८६ मि. मी

पश्चिम उपनगरे : १६८ मि. मी

सर्वाधिक पाऊस नोंदविण्यात आलेली ठिकाणे –

मलबार हिल: १७४ मि. मी

वरळी, प्रभादेवी : १७२ मि. मी

फ्रॉसबेरी जलाशय: १७२ मि. मी

लोअर परळ, करिरोड: १७० मि. मी

कुलाबा पंपींग स्टेशन: ६७ मि. मी,

प्रतिक्षा नगर मनपा शाळा,

सायन ५८ मि. मी

एफ/उत्तर विभाग ५१ मि. मी,

कुलाबा अग्रिशमन केंद्र ४७ मि. मी

रावळी कॅम्प ४७ मि. मी

पूर्व उपनगरेः

विक्रोळी पश्चिम २६३मि. मी,

टागोर नगर मनपा शाळा विक्रोळी २५०मि.मी

पाचपोली मनपा शाळा पवई २४९.६ मि. मी,

विक्रोळी अग्रिशमन केंद्र २३५मि.मी

भांडुप संकुल: २४३, मि.मी

बर्वे नगर मनपा शाळा, घाटकोपर १३७ मि. मी

https://prahaar.in/2026/07/05/bmc-news-sonography-of-tree-roots/

पश्चिम उपनगरेः

मालाड पी उत्तर विभाग कार्यालय:२३४ मि. मी

चिंचोली फायर स्टेशन: २३४ मि. मी

कांदिवली फायर स्टेशन : २२८ मि. मी

वर्सोवा लगून १४४ मि. मी

जोगेश्वरी पूर्व: २१९ मि. मी

चकाला मनपा शाळा अंधेरी १२७,मि. मी

अंधेरी अग्रिशमन केंद्र १२५ मि. मी

के पश्चिम विभाग कार्यालय १२४ मि. मी

मुंबई उपनगरात सकाळी ८ पासून सुरु असलेला मुसळधार पाऊस आणि समुद्रास दुपारी २.५० वाजता. समुद्रास ४ .२६ मीटर उंचीची भरती होती .. या भरतीच्या काळात काही ठिकाणी पाणी साचण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

शहर: परळ, हिंदमाता, गांधी मार्केट आणि वडाळा

पूर्व उपनगरे – साकिनाका, काजूपाडा काळे मार्ग कुर्ला, अशोक नगर कुर्ला, छेडानगर जंक्शन चेंबूर, पवई, भांडूप,

पश्चिम उपनगरे: अंधेरी, विलेपार्ले, सांताक्रुझ, गोरेगांव पूर्व, दहिसर

https://prahaar.in/2026/07/05/over-100-tourists-stranded-at-khopolis-zenith-waterfall-all-safely-rescued-after-a-three-hour-operation/

झाडे पडणेः शहरात २१, पूर्व उपनगरात २६ व पश्चिम उपनगरात ५६ अशा एकूण १०३ ठिकाणी फांद्या व झाडे पडण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या, जीवितहानी नाही.
दादर पश्चिम माँसाहेब मीनाताई ठाकरे मंडईत एक मोठे झाड उन्मळून पडले. सुदैवाने यात कुठलीही जिवित हानी झाली नाही. तसेच माटुंगा पूर्व भागात विशाल झाड पडून अनेक वाहनांचे नुकसान झाले.

घरे / भिंती पडणेः शहरात ३, पूर्व उपनगरात ७ व पश्चिम उपनगरात ७ अशा एकूण १७ ठिकाणी घरे / भिंती पडण्याच्या घटना घडल्या.

मुंबईत एकूण शॉर्ट सर्किटच्या १८ घटना घडल्या असून यात शहरात ०४, पूर्व उपनगरात ०६ आणि पश्चिम उपनगरात ०८ आदी घटनांचा समावेश आहे.

बेंगनवाडीत घराचे भाग कोसळून दोन जण जखमी

दुपारी १.२२ वा. अग्रिशमन नियंत्रण कक्षाकडून प्राप्त माहितीनुसार प्लॉट नं २१, जी लाईन रोड नं. १०, बैंगनवाडी येथे तळमजला अधिक एक मजला असे बांधकाम असलेले घर पडले. सदर घटनेत १ पुरुष व १ महिला जखमी झाली असून त्यांना राजावाडी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती स्थिर आहे.

पश्चिम रेल्वे (Western Railways) :  नालासोपारा व वसई येथे रेल्वे रुळांवर पाणी आल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक २० ते २५ मिनीटे उशिराने सुरु आहे.

मध्य रेल्वे (Central Railways) : मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत सुरु आहे.

बीईएसटी (BEST) रस्त्यांवर पाणी भरल्यामुळे पश्चिम उपनगरातील ५ व पूर्व उपनगरात १ ठिकाणी बीईएसटीची वाहतूक वळविण्यात आली आहे.

बसमार्ग केले बंद

चेंबूर येथील नूर ए इलाही सेवा रस्ता, अंधेरी येथील वीरा देसाई रस्ता, महानगरपालिका बाजारपेठ रस्ता, अंधेरी येथील स्वामी विवेकानंद मार्ग, अंधेरी भुयारी मार्ग, विक्रोळी हुमा मॉल जंक्शन, गांधीनगर जंक्शन आणि परेश पार्क बाजारपेठ येथील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. नागरिकांनी याची नोंद घेऊन या रस्त्यांवर प्रवास करणे टाळावे असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

भांडुप (Bhandup) पश्चिम येथे रस्ता खचला

भांडुप (पश्चिम) येथे लालबहादूर शास्त्री मार्गावर एशियन पेंटजवळ सुरू असलेल्या बांधकामालगतचा रस्ता खचल्याची घटना शनिवारी ४ जुलै २०२६ रोजी दुपारी घडली. या ठिकाणी सुमारे १०० x १०० चौरस फूट क्षेत्रफळाचा रस्ता खचल्यामुळे तेथील झाडे कोसळली आणि खोदकाम सुरू असलेल्या ठिकाणी एक टेम्पोही खड्ड्यात कोसळला. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेनंतर एस विभाग कार्यालय, मुंबई अग्निशमन दल, पोलिस यांनी परिसरात बॅरिकेड्स लावले आणि परिसर सुरक्षित केला.

या घटनास्थळी मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी आज भेट देऊन परिसराची पाहणी केली. यावेळी एस व टी प्रभाग समिती अध्यक्ष साक्षी दळवी, सहायक आयुक्त समरीन सय्यद आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
घटनास्थळी पाहणी केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुंबईच्या महापौर रितू तावडे म्हणाल्या की, भर पावसात या ठिकाणी सुरू असलेल्या पाया भरणी कामामुळे माती सैल होऊन रस्ता खचला, असा स्थानिक रहिवाशांचा आरोप आहे. या प्रकरणी संपूर्ण चौकशी केली जाईल. स्थानिक प्रशासनाने नोटीस बजावून देखील बांधकाम सुरू ठेवण्यात आले होते, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. चौकशी अंती जे तथ्य आणि सत्य समोर येईल, त्यानुसार योग्य कारवाई केली जाईल, असे महापौरांनी स्पष्ट केले.+

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here