Home ब्रेकिंग न्यूज Jalna Bus Accident : जालना-बीड महामार्गावर भीषण अपघात! दोन एसटी बसची समोरासमोर धडक; चालकांसहअनेक प्रवासी जखमी

Jalna Bus Accident : जालना-बीड महामार्गावर भीषण अपघात! दोन एसटी बसची समोरासमोर धडक; चालकांसहअनेक प्रवासी जखमी

0
Jalna Bus Accident : जालना-बीड महामार्गावर भीषण अपघात! दोन एसटी बसची समोरासमोर धडक; चालकांसहअनेक प्रवासी जखमी

जालना : जालना-बीड महामार्गावर शनिवारी सकाळी भीषण अपघात झाला. अंबड तालुक्यातील शहापूरजवळ गल्हाटी नदीच्या पुलावर अंबड आगाराच्या दोन एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात दोन्ही बसचे चालकांसह सुमारे ३० ते ४० प्रवासी जखमी झाले असून, त्यामध्ये मोठ्या संख्येने शाळकरी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. (Jalna Bus Accident)

स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत बचावकार्य सुरू केले. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून रुग्णवाहिकांच्या मदतीने अंबड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे. (Jalna Bus Accident)

https://prahaar.in/2026/07/04/mumbai-rain-shocking-road-caves-in-at-bhandup-tempo-and-tree-vanish-into-the-ground-in-the-blink-of-an-eye/

गल्हाटी नदीच्या पुलावर झाला अपघात :

मिळालेल्या माहितीनुसार, MH-14 MH-1750 क्रमांकाची एसटी बस भाबेरी येथून शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन अंबडकडे येत होती. तर MH-14 BT-3022 क्रमांकाची दुसरी एसटी बस अंबडहून बीडकडे जात होती. सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास शहापूरजवळील गल्हाटी नदीच्या पुलावर दोन्ही बसची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिक तत्काळ घटनास्थळी पोहोचले. (Jalna Bus Accident)

अपघातामुळे दोन्ही बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. बसमधील अनेक प्रवाशांना दुखापत झाली असून, शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही गंभीर मार लागल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दोन्ही बस चालकही जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (Jalna Bus Accident)

नागरिकांनी राबवले मदतकार्य :

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी जीवाची पर्वा न करता बचावकार्य हाती घेतले. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी त्यांनी मोठी मदत केली. त्यानंतर रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आणि सर्व जखमींना उपचारासाठी अंबड ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. (Jalna Bus Accident)

https://prahaar.in/2026/07/04/ketan-agarwal-murder-case-a-new-twist-in-the-ketan-agarwal-murder-case-siyas-old-mobile-phone-seized-from-her-home-codeword-chats-and/

अपघाताचे कारण काय?

प्राथमिक तपासात बीडकडे जाणाऱ्या एसटी बसच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून वाहतूक सुरळीत करण्याचे काम हाती घेतले. अपघातामुळे जालना-वडिगोद्री महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. अपघातग्रस्त बस हटवल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. (Jalna Bus Accident)

या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, एसटी प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here