पुणे : लोहगड किल्ल्यावर केतन अगरवाल यांच्या कथित हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्याविरोधातील तपासाला पुणे ग्रामीण पोलिसांनी वेग दिला आहे. तपासाच्या अनुषंगाने गुरुवारी सिया गोयलला विविध ठिकाणी नेऊन पंचनामे करण्यात आले. यावेळी माध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद झालेला तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.(Siya Goyal)
View this post on Instagram
दरम्यान, दोन्ही आरोपींची पोलीस कोठडी शुक्रवारी संपत असल्याने त्यांना पुढे न्यायालय पोलीस कोठडी देणार की न्यायालयीन कोठडीत रवानगी करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांचे पुत्र केतन अगरवाल यांचा १८ जून रोजी पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावरून ढकलून खून करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी त्यांची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात ही हत्या पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तपासादरम्यान पोलिसांनी सिया गोयलला मार्केट यार्ड परिसरातील ‘लीलाकुंज’ येथील तिच्या निवासस्थानी नेऊन पंचनामा केला. त्यानंतर लुल्लानगरमधील फाखरी हिल्स आणि एरिया-३७ परिसरातही घटनासंदर्भातील पाहणी करण्यात आली. यावेळी घटनेच्या दिवशी सिया गोयलने परिधान केलेले कपडे पोलिसांनी जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील घटनाक्रम, पुरावे आणि आरोपींच्या भूमिकेचा सखोल तपास पुणे ग्रामीण पोलिसांकडून सुरू असून, न्यायालयातील पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(Siya Goyal).
View this post on Instagram