नवी दिल्ली : अयोध्येच्या श्रीराम मंदिरातील दानपेट्यांमधून झालेल्या चोरी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी. तसेच त्यांनी कडक शिक्षा करावी अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केली आहे. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी शुक्रवारी यासंदर्भात व्हिडीओ जारी करत पहिल्यांदाच या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे.
https://prahaar.in/2026/07/03/nilesh-rane-officials-provide-false-information-to-ministers-regarding-smart-meter-complaints/
यासंदर्भात सरकार्यवाह होसबळे म्हणाले की, श्री रामलला मंदिरातील दानपेट्यांमधून झालेली चोरी ही अत्यंत दुर्दैवी घटना असून, त्यामुळे संपूर्ण समाजासह कोट्यवधी रामभक्तांच्या श्रद्धा आणि भावनांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेमुळे सर्वांनाच दुःख झाले असल्याचे त्यांनी नमूद केले.त्यांनी सांगितले की, श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या विशेष विनंतीनंतर उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. या तपासाच्या निष्कर्षांच्या आधारे कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली असून, चौकशीत दोषी आढळणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कठोर शिक्षा मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच त्यांनी अपेक्षा व्यक्त केली की, ही अत्यंत निंदनीय घटना अपवाद म्हणूनच पाहिली जावी. मंदिराच्या व्यवस्थापन आणि कार्यपद्धतीतील सर्व त्रुटी दूर करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात, जेणेकरून अयोध्येतील राम मंदिराबाबत कोट्यवधी रामभक्तांची श्रद्धा आणि विश्वास कायम अबाधित राहील.
https://prahaar.in/2026/07/03/when-the-situation-demanded-they-abandoned-god-to-ally-with-ravana-and-now-the-shiv-sena-shinde-faction-launches-a-scathing-counter-attack-on-uddhav-thackeray/
अयोध्येत घडलेल्या घटनेमुळे निर्माण झालेली संभ्रमाची आणि अनिश्चिततेची परिस्थिती लवकरात लवकर दूर होणे गरजेचे आहे. मंदिर प्रशासन आणि विशेष तपास पथक या प्रकरणात आवश्यक ती सर्व पावले उचलतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच पारदर्शक आर्थिक व्यवस्थापन, निष्पक्ष कार्यपद्धती आणि धार्मिक पावित्र्य जपत श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट हिंदू समाजाचा विश्वास अधिक दृढ करेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यासोबतच संघाने संपूर्ण हिंदू समाजाला संयम आणि धैर्य राखण्याचे आवाहन केले आहे. या दुर्दैवी घटनेचा गैरफायदा घेत हिंदू धर्म आणि समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या हिंदूविरोधी आणि राष्ट्रविरोधी शक्तींचे प्रयत्न हाणून पाडावेत, असे आवाहनही दत्तात्रेय होसबळे यांनी केले आहे.