मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील कुर्ला खैरानी रोडवरील मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर पुन्हा एकदा मॅनहोल्समधील दुघर्टनांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ऑगस्ट २०१७मध्ये मुसळधार पावसात प्रभादेवी येथे रस्त्यावर पाणी साचल्यानंतर प्रसिद्ध डॉ. दीपक अमरापूरकर यांचा मॅनहोलमध्ये पडून दुर्देवी मृत्यू झाला. त्यानंतर सन २०१८पासून मॅनहोल्समध्ये जाळ्या बसवण्याच्या कामाला सुरुवात झाली असली तरी तेव्हापासून आजपासून अनेक घटना घडून निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत. डॉ.अमरापूरकर यांचा बळी मॅनहोलमध्ये पडून गेल्यानंतर तत्कालिन समाजवादी पक्षाचे महापालिका गटनेते रईस शेख यांनी मॅहोल्समध्ये जाळ्या बसवण्याची मागणी केली होती. रईस शेख यांच्या सूचनेची दखल तत्कालिन महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी घेतली. मॅनहोल्समध्ये मनुष्य सुरक्षेच्या दृष्टीकोनातून जाळ्या बसवण्यचा निर्णय घेतला.
https://prahaar.in/2026/07/02/four-officials-suspended-in-connection-with-the-sakinaka-manhole-tragedy/
- एप्रिल २०१४ मध्ये मालाड येथे रघु सोळंकी आणि जावेद शेख (कामगार) यांचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू
- २०१८ मध्ये मालाड येथे मॅनहोलमध्ये पडून अर्जुन (१८) या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू
- मार्च २०२४ मध्ये मालाड येथेच मॅनहोलमध्ये पडून सुरज केवत, विकास केवत आणि रामलगन केवत यांचा दुर्दैवी मृत्यू