– बनावट ग्राहक पाठवून पोलिसांची कारवाई
मुंबई : मुंबई पोलिसांनी गिरगाव परिसरातील एका हॉटेलवर छापा टाकत कथित हाय-प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन महिलांची सुटका करण्यात आली असून त्यापैकी एक मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री, तर दुसरी बंगाली आणि हिंदी चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारलेली अभिनेत्री असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी एका संशयित दलालाला अटक करण्यात आली असून तो सेलिब्रिटींसोबत काम करणारा मेकअप आर्टिस्ट असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. (High-profile Sex Racket)
बनावट ग्राहक पाठवून पोलिसांची कारवाई :
पोलिसांना गिरगावातील एका हॉटेलमध्ये देहव्यापार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेने सापळा रचला. यासाठी प्रथम एका बनावट ग्राहकाला हॉटेलमध्ये पाठवण्यात आले. बेकायदेशीर व्यवहाराची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून दोन महिलांची सुटका केली आणि घटनास्थळावरून एका संशयित दलालाला ताब्यात घेतले. (High-profile Sex Racket)
https://prahaar.in/2026/06/30/minister-nitesh-rane-maharashtras-abhishek-banerjee-is-set-to-empty-out-the-ubt-faction/
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची सुटका :
पोलिसांच्या माहितीनुसार, सुटका करण्यात आलेल्या महिलांपैकी एक अभिनेत्रीने अनेक मराठी चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. तर दुसरी अभिनेत्री बंगाली चित्रपटसृष्टीसोबतच काही हिंदी चित्रपटांमध्ये लहान भूमिका आणि कॅमिओसाठी ओळखली जाते. मात्र, तपासाच्या हितासाठी आणि पीडितांच्या गोपनीयतेचा सन्मान राखत पोलिसांनी दोन्ही महिलांची ओळख जाहीर केलेली नाही. (High-profile Sex Racket)
मेकअप आर्टिस्ट दलालाच्या भूमिकेत?
या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी हा चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि सेलिब्रिटींसोबत काम करणारा मेकअप आर्टिस्ट असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तो महिलांना ग्राहकांशी संपर्क करून देण्याचे काम करत असल्याचा संशय असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे. (High-profile Sex Racket)
https://prahaar.in/2026/06/30/no-relief-for-asaram-from-the-supreme-court/
आर्थिक व्यवहार आणि हॉटेलच्या भूमिकेचाही तपास :
या रॅकेटमध्ये आर्थिक व्यवहार कसे होत होते, आणखी किती जणांचा सहभाग आहे, तसेच संबंधित हॉटेल व्यवस्थापनाची यामध्ये काही भूमिका होती का, याचाही तपास पोलीस करत आहेत. याशिवाय सुटका करण्यात आलेल्या महिलांना देहव्यवसाय करण्यास जबरदस्ती करण्यात आली होती का, त्यांना धमकावले जात होते का आणि या रॅकेटमध्ये आणखी महिलांना अडकवण्यात आले आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. (High-profile Sex Racket)