Home क्राईम Ashok Kharat : लोकांचे भविष्य सांगणारा खरात स्वतः भविष्याबाबत चिंतेत; कारण काय ?

Ashok Kharat : लोकांचे भविष्य सांगणारा खरात स्वतः भविष्याबाबत चिंतेत; कारण काय ?

0
Ashok Kharat : लोकांचे भविष्य सांगणारा खरात स्वतः भविष्याबाबत चिंतेत; कारण काय ?
ashok.kharat

Ashok Kharat : संपूर्ण देशाला हादरवणारा नाशिकचा भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) आता स्वतःच्या भविष्याबाबत चिंतेत आहे. १८ मार्चपासून लैंगिक अत्याचार (Sexual assault) तसेच आर्थिक फसवणूक (Financial fraud) प्रकरणातील गुन्ह्यात खरात तुरुंगात आहे. लोकांचे भविष्य सांगणारा खरात आता मात्र स्वत:च्या भविष्याबाबत अधिकच चिंतेत दिसत असल्याचे पाेलिस सूत्रांनी (Police sources) सांगितले आहे.

नाशिकमध्ये (Nashik) दाखल असलेल्या १४ गुन्ह्यांपैकी नऊ गुन्ह्यांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले आहे. दाखल दोषारोपपत्रात खरातची महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठीची मोडस ऑपरेंडी कथन करण्यात आली असून, खरात प्रकरणाच्या खटल्यात सरकारची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे. दैवीशक्ती असल्याचे भासवून महिलांवर अत्याचार केल्याचा आरोप खरातवर आहे.

https://prahaar.in/2026/06/30/micro-atm-facility-at-milk-collection-centres-in-jalgaon/

खरातला पत्नी, मुलाची काळजी

१८ मार्चपासून तुरुंगात असलेला अशोक खरात जवळपास आता गेल्या शंभरहून अधिक दिवसांपासून तुरुंगात आहे. पत्नी कल्पना खरात (Kalpana Kharat) अडीच महिन्यांपासून फरार आहे. तिचा थांगपत्ता अद्यापही पोलिसांना लागत नाही आहे. कल्पना खरात कुठे असू शकते, असा प्रश्न खरातला विचारला असता मलाच तिची अन् मुलगा हर्षवर्धनची चिंता वाटत असल्याचे तो म्हणाला, मात्र, पत्नीपेक्षा मुलाची चिंता खरातला अधिक सतावत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

https://prahaar.in/2026/06/30/hsrp-number-plate-only-49-of-vehicles-in-the-state-have-hsrp-number-plates/

कल्पना खरातची सर्वोच्च न्यायालयात धाव

दरम्यान, शिर्डी येथील भूखंड बळकावल्याच्या कथित प्रकरणात अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर अशोक खरात यांची पत्नी कल्पना खरातने आता सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) दरवाजे ठोठावले आहेत. सिन्नर (Sinnar) तालुक्यातील मिरगाव येथील १६.५० एकर जमीन व्यवहाराशी संबंधित गुन्ह्यात नाशिकरोड (Nashik Road) येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने त्यांना सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे एका प्रकरणात न्यायालयीन दिलासा मिळाला असला तरी शिर्डी भूखंड प्रकरणातील निर्णयावर त्यांच्या अटकेचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे शिर्डी येथील भूखंड बळकावल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने अटकपूर्व अर्ज फेटाळल्यानंतर कल्पना खरात हिने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

https://prahaar.in/2026/06/30/major-revelation-in-the-nashik-mhada-scam/

एसआयटीकडून पुरावे जप्त : कुटुंब आर्थिक विवंचनेत आहे, पतीची नोकरी गेली आहे, यावर इलाज शोधायला गेलेल्या महिलांचे लैंगिक शोषण भोंदू खरातने केले. दाखल दोषारोपपत्रात पोलिसांनी डिजिटल पुराव्यांचा उल्लेख केला आहे. खरातच्या ऑफिसमधून अनेक पुरावे एसआयटीने या आधीच जप्त केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here