Home महाराष्ट्र नाशिक Jalgaon : जळगावात दूध संकलन केंद्रांवर ‘मायक्रो एटीएम’ सुविधा; पशुपालक शेतकऱ्यांना गावातच मिळणार बँकिंग सेवा

Jalgaon : जळगावात दूध संकलन केंद्रांवर ‘मायक्रो एटीएम’ सुविधा; पशुपालक शेतकऱ्यांना गावातच मिळणार बँकिंग सेवा

0
Jalgaon : जळगावात दूध संकलन केंद्रांवर ‘मायक्रो एटीएम’ सुविधा; पशुपालक शेतकऱ्यांना गावातच मिळणार बँकिंग सेवा

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील पशुपालक शेतकऱ्यांसाठी (Livestock farmers)  दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच जिल्ह्यातील दूध संकलन केंद्रांवर ‘मायक्रो एटीएम’ (Micro ATM) सुविधा उपलब्ध करून देण्यावर जिल्हा प्रशासन भर देणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना गावातच बँकिंग सेवा (Banking Services) मिळणार असून आर्थिक व्यवहार अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक होणार आहेत.

जिल्हाधिकारी रोहन घुगे (Rohan Ghuge) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हास्तरीय कार्य समितीच्या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. दूध संकलन केंद्रांवर(Milk collection centers)  नियमितपणे येणाऱ्या शेतकऱ्यांना त्याच ठिकाणी बँकिंग सेवा (Banking Services) उपलब्ध करून देण्याचा निर्णय यावेळी मांडण्यात आला.

https://prahaar.in/2026/06/30/sachin-ahir-to-file-nomination-for-deputy-chairman-post-on-behalf-of-shiv-sena/

दूध संकलन केंद्रे बँकिंग सेवेचे माध्यम

मायक्रो एटीएम (Micro ATM) सुविधेमुळे पशुपालक शेतकऱ्यांना दुधाचे पैसे खात्यात जमा झाल्यानंतर गावातच रोख रक्कम काढणे, खात्यातील शिल्लक तपासणे, मिनी स्टेटमेंट मिळवणे आणि आधार आधारित बँकिंग व्यवहार करणे शक्य होणार आहे. त्यामुळे बँकेपर्यंत जाण्यासाठी होणारा वेळ आणि खर्च वाचणार असून ग्रामीण भागातील डिजिटल व्यवहारांनाही चालना मिळणार आहे. याशिवाय, जिल्ह्यात बँकिंग सुविधा अपुऱ्या असलेल्या भागांमध्ये नवीन शाखा सुरू करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.

https://prahaar.in/2026/06/30/hsrp-number-plate-only-49-of-vehicles-in-the-state-have-hsrp-number-plates/

बँकिंग विस्तारासह निर्यातीला चालना

ग्रामीण व दुर्गम भागात बँकिंग सेवांचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी बँकांनी आवश्यक नियोजन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. जिल्ह्यातील निर्यात व्यवसायाला चालना देण्यासाठी विद्यमान निर्यातदारांना अधिक सक्षम वित्तीय पाठबळ उपलब्ध करून देणे, तसेच नव्या निर्याताभिमुख उद्योगांना कर्ज पुरवठा वाढविण्यासाठी बँकांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, असे निर्देशही बैठकीत देण्यात आले. यावेळी वार्षिक पत योजना (एसीपी) अंतर्गत निर्धारित उद्दिष्टे आणि आतापर्यंत झालेल्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. वर्ष अखेरीस उद्दिष्टपूर्तीसाठी आवश्यक धोरणे आणि बँकांनी घ्यावयाच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.

https://prahaar.in/2026/06/30/major-revelation-in-the-nashik-mhada-scam/

शासकीय योजनांचा आढावा

बैठकीत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, पीएमएफएमई (c) , पीएम स्वनिधी (PM Svanidhi) , पीएम विश्वकर्मा (PM Vishwakarma Yojana) , अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana) , प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेच्या (Pradhan Mantri Suraksha Bima Yojana) प्रगतीचाही आढावा घेण्यात आला. प्रलंबित प्रस्तावांचा तातडीने निपटारा करून लाभार्थ्यांना वेळेत कर्ज व योजनांचा लाभ देण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here