५५ दिवसात दोषारोप सिद्ध करून आरोपीला फाशीची शिक्षा दिल्याबद्दल शिवसेना महिला आघाडीकडून महायुती सरकार, पोलीस आणि न्यायव्यवस्थेचे आभार
नसरापूर मधील चिमुकलीच्या कुटुंबियांना न्याय मिळाल्याबद्दल व्यक्त केले समाधान
मुंबई :- नसरापूर मधील चिमुकलीवर अमानुष अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करणारा नराधम भीमराव कांबळेला(Bhimrav Kamble) फाशीची शिक्षा दिल्याबद्दल शिवसेना महिला आघाडीने समाधान व्यक्त केले. मात्र या फाशीच्या शिक्षेची त्वरित अंमलबजावणी करून पीडितेच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा अशी आग्रही मागणी त्यांनी केली. तसेच या आरोपीला सार्वजनिकरीत्या फासावर चढवून न्याय करावा अशीही मागणी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने यावेळी करण्यात आली.
नसरापूर येथे झालेल्या या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या चिमुकलीवर पाशवी अत्याचार करून खून करणाऱ्या नराधमाला लवकरात लवकर शासन व्हावे अशी आग्रही मागणी समाजाच्या प्रत्येक स्तरातून करण्यात आली होती. जनभावनेचा आदर करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची घोषणा केली. त्यासोबतच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही पोलीस अधीक्षकांना या प्रकरणी त्वरित कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.
https://prahaar.in/2026/06/29/mumbai-goa-highway-accident-horrific-accident-on-the-mumbai-goa-highway-head-on-collision-between-a-car-and-a-pickup-near-pavshi/
त्यानुसार पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा विशेष तपास करून अवघ्या १५ दिवसांच्या आत १२०० पानांचे आरोपपत्र कोर्टात दाखल केले. तसेच न्यायालयाने त्वरित सुनावणी घेत अवघ्या ५५ दिवसात आरोप निश्चित करून आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. महिलांवर झालेल्या गुन्ह्याची एवढ्या तातडीने सुनावणी करून आरोपीला कठोर शिक्षा दिल्याचे हे राज्यातील पहिलेच प्रकरण आहे. त्यामुळे या निकालामुळे एक वेगळा मापदंड निर्माण झाला असून अशा गुन्ह्यांना त्वरित शासन होणे शक्य असल्याचा संदेश गेला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीने पुणे ग्रामीण पोलीस, न्यायव्यवस्था आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे विशेष आभार मानत असल्याचे शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
तसेच अशाप्रकारची घटना घडणे हे अत्यंत चुकीचे असून एकीकडे हा निर्णय आल्याचे समाधान वाटत असतानाच, त्या मुलीच्या आईच्या मनाची अवस्था पाहून आमच्याही एका डोळ्यात हसू तर दुसऱ्या डोळ्यात आसू आहेत अशी भावना व्यक्त केली. अशा कृत्यांना जबाबदार असलेल्या आरोपींना भर चौकात फासावर चढवले तरच इतरांना धाक बसेल असेच प्रत्येक महिलेचे मत आहे. मात्र आजच्या या निकालामुळे न्यायव्यवस्था अजूनही मजबूत असून अशा घटनांमध्ये त्वरित न्याय मिळणे शक्य असल्याचे दाखवून दिले असल्याचे मत शीतल म्हात्रे यांनी(Sheetal Mhatre) व्यक्त केले. मात्र या शिक्षेची त्वरित अंमलबजावणी व्हायला हवी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
https://prahaar.in/2026/06/29/tet-exam-mcoca-to-be-invoked-against-those-guilty-in-the-tet-paper-leak-case-exams-to-go-online-from-next-year/
फास्ट ट्रॅक कोर्टात(Fast track court) या प्रकरणाची सुनावणी करण्याचा घेतलेला निर्णय आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी हा या प्रकरणातील चिमुकलीला न्याय मिळवून देण्यात निर्णायक टप्पा ठरला. या प्रकरणी जरी पुढे उच्च न्यायालयात सुनावणी होणार असली तरीही आरोपीला नक्की फाशीची शिक्षा होईल असे मत शिवसेना प्रवक्त्या सुशिबेन शहा यांनी व्यक्त केले.
अशा घटनांना वचक बसावा यासाठीच राज्याच्या विधानसभेत शक्ती कायदा पारित झाला असून तो केंद्र शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवला आहे. केंद्र सरकार याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेईल असा विश्वासही देखील सुशिबेन शहा यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
आजच्या या निकालाचे शिवसेना पक्षाच्या आणि महिला आघाडीच्या वतीने आम्ही स्वागत करत असून या निर्णयाबद्दल महायुती सरकारचे आभार मानत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महायुती सरकारचा विजय असो असे म्हणत घोषणा देण्यात आल्या.
यावेळी शिवसेना प्रवक्त्या सौ. शीतल म्हात्रे, सुशिबेन शहा, उपनेत्या संध्या वढावकर,
सुवर्णा करंजे, कला शिंदे, ज्येष्ठ नगरसेविका तृष्णा विश्वासराव, राजुल पटेल आणि महिला आघाडीतील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्या
आवर्जून उपस्थित होत्या.