Home महाराष्ट्र नाशिक Nashik News : नांदूर मध्यमेश्वरमध्ये 6,215 पक्ष्यांची नोंद

Nashik News : नांदूर मध्यमेश्वरमध्ये 6,215 पक्ष्यांची नोंद

0
Nashik News : नांदूर मध्यमेश्वरमध्ये 6,215 पक्ष्यांची नोंद

Nashik News : जागतिक दर्जाचे रामसर स्थळ म्हणून ओळख मिळवणाऱ्या नांदूर मध्यमेश्वर (Nandur Madhmeshwar) वन्यजीव अभयारण्यात (रविवार) पावसाळापूर्व पक्षी प्रगणना झाली. अभयारण्यातील जैवविविधतेचा शास्त्रीय अभ्यास करणे, तसेच स्थानिक, स्थलांतरित पक्षी प्रजातींची नोंद घेण्यासाठी नांदूर मध्यमेश्वर वन्यजीव विभागाच्या (Nandur Madhmeshwar Wildlife Division) वतीने या विशेष पक्षी प्रगणनेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, या पक्षी गणनेत एकूण ६,२१५ पक्ष्यांची नोंद करण्यात आली.

https://prahaar.in/2026/06/29/opposition-walks-out-of-assembly-over-tet-issue/

६० हून अधिक प्रजातींची नोंद

या प्रगणनेदरम्यान अभयारण्यात स्थानिक पाणपक्ष्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर आढळला. यामध्ये प्रामुख्याने वैशिष्ट्यपूर्ण पक्ष्यांच्या सुमारे ६० हून अधिक प्रजातींची नोंद करण्यात आली. प्रमुख स्थानिक पाणपक्षी व अन्य प्रजाती: बिटर्न’ (Bittern), चित्रबलाक (Painted Stork), चमचा (Eurasian Spoonbill), हळदीकुंकू बदक (Spot-billed Duck), जांभळी पाणकोंबडी (Purple Swamphen), गडवाल (Gadwall), हळद्या (Golden Oriole), राखी बगळा (Grey Heron), सुगरण (Baya Weaver), उघड्या चोचीचा करकोचा (Asian Openbill), शेराटी (Glossy Ibis), पांढऱ्या मानेचा करकोचा (Woolly-necked Stork), कपाशी घार (Black-winged Kite), लहान पाणकावळा (Little Cormorant), खंड्या (kingfisher) , नदीसुराय (river turn) आणि मोठ्या संख्येत वारकरी (comman coot ) , कापशी बदक इत्यादी पक्षी दिसून आले.

https://prahaar.in/2026/06/29/nashik-76-percent-of-children-in-the-city-have-received-polio-doses/

एकूण पक्षी संख्या वर्गीकरण

पाणथळ पक्षी (Waterbirds) : ४,७७८

झाडांवरील पक्षी (Terrestrial Birds) : १,४३७

एकूण नोंदवलेले पक्षी : ६,२१५

https://prahaar.in/2026/06/29/nasrapur-case-bhimrao-kamble-the-accused-in-the-nasrapur-atrocity-case-sentenced-to-death/

नाशिक ते नांदूर मध्यमेश्वर भव्य सायकल रॅली

दरम्यान, या उपक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य राहिले ते सायकल रॅली (Bicycle Rally). पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी नाशिक सायकलिस्ट आणि नांदूर मध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्य यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक ते अभयारण्य अशी भव्य सायकल रॅली काढण्यात आली होती. नाशिक सायकलिस्टचे अमित घुगे यांच्या नेतृत्वाखाली या रॅलीचे नियोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे या रॅलीमध्ये सुमारे ११० सायकलस्वार सहभागी झाले होते. सायकलस्वारांनी मार्गात ठिकठिकाणी नागरिकांना प्रदूषणमुक्ती आणि पक्षी संवर्धनाचे आवाहन करत पर्यावरण जनजागृतीचा महत्त्वपूर्ण संदेश दिला.

या हंगामात असलेल्या पंक्ष्यांची संख्या आणि प्रजातीची जैवविविधता हे गेल्या वर्षभर अभयारण्य व्यवस्थापनाने रबिवलेल्या अधिवास संवर्धन आणि संरक्षण कामाचे यश म्हणाव लागेल. नांदूर मध्यमेश्वराला आता केवळ हंगामी पक्षी दिसत नसून वर्षभर पक्षी दर्शन होत आहे. तेव्हा पक्षीप्रेमींनी अभयारण्याला भेट देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

हिरालाल चौधरी ( वनपरिक्षेत्र अधिकारी, नांदूर मध्यमेश्वर )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here