Home ब्रेकिंग न्यूज TET Exam Paper Leak : विधानसभेत ‘टीईटी’च्या मुद्द्यावरून विरोधकांचा सभात्याग

TET Exam Paper Leak : विधानसभेत ‘टीईटी’च्या मुद्द्यावरून विरोधकांचा सभात्याग

0
TET Exam Paper Leak : विधानसभेत ‘टीईटी’च्या मुद्द्यावरून विरोधकांचा सभात्याग
vidhanbhavan

मुंबई : नीट, टीईटी यांसारख्या महत्त्वाच्या परीक्षांमध्ये वारंवार पेपरफुटीच्या घटना घडत असल्याने राज्याची देशभर बदनामी होत असून, लाखो विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे, असा आरोप विरोधकांनी सोमवारी विधानसभेचे कामकाज सुरू होताच केला. यावेळी स्थगन प्रस्ताव मांडू न दिल्याने विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालत सभात्याग केला. दरम्यान, या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी ‘एसआयटी’ची घोषणा केली असून, टीईटी पेपरफुटीप्रकरणी लवकरच सविस्तर निवेदन सादर करणार असल्याने शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आश्वस्त केले. (TET Exam Paper Leak)

https://prahaar.in/2026/06/29/nasrapur-case-bhimrao-kamble-the-accused-in-the-nasrapur-atrocity-case-sentenced-to-death/

विधानसभेचे आजचे कामकाज सुरू झाल्यावर विरोधकांनी स्थगन मांडण्याची विनंती केली. काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले, लाखो विद्यार्थी आणि शिक्षक वर्षानुवर्षे मेहनत घेऊन परीक्षेची तयारी करतात. मात्र, पेपरफुटीच्या घटनांमुळे त्यांच्या कष्टांवर पाणी फिरत आहे. परीक्षा पारदर्शक पद्धतीने घेण्यात सरकार वारंवार अपयशी का ठरत आहे, याचे उत्तर सरकारने महाराष्ट्राला द्यावे. टीईटी पेपरफुटीप्रकरणातील धागेदोरे, पेपर तयार करणाऱ्या संस्था, संबंधित कंपन्या आणि या प्रकरणामागील संपूर्ण साखळीची सखोल चौकशी करावी. तीन आरोपींना अटक झाली असली, तरी त्यांचे दुसऱ्या राज्यांशी असलेले संबंधही समोर येत आहेत. त्यामुळे या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश होणे आवश्यक आहे. (TET Exam Paper Leak)

https://prahaar.in/2026/06/29/maharashtra-monsoon-update-strong-return-of-the-monsoon-in-the-state-alert-issued-for-22-districts-warning-of-heavy-rain-accompanied-by-thunderstorms-in-several-regions-including-vidarbha-and-konk/

२०१८ मधील टीईटीघोटाळ्यातील आरोपी अभिषेक सावरीकर याचा उल्लेख करत वडेट्टीवार म्हणाले की, घोटाळ्यात आरोपी असलेल्या व्यक्तींना नंतर भाजपमध्ये सन्मानाने प्रवेश मिळाला. क्रिस्टलचे नाव कुठून येत आहे? सरकारच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, हे सरकारपुरस्कृत घोटाळे आहेत का, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. राज्यातील विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले असून या गंभीर विषयावर विधिमंडळात सविस्तर चर्चा व्हावी. सरकारने दोषींवर कठोर कारवाई करण्याबरोबरच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कोणती ठोस पावले उचलणार आहे, आरोपींवर कठोर कारवाई करण्याची अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केली. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी स्थगन नाकारल्याने महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभात्याग केला. (TET Exam Paper Leak)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here