Home महाराष्ट्र नाशिक Nashik : शहरात 76 टक्के बालकांना पोलिओ डोस, उर्वरित बालकांना घरी जाऊन लस देणार

Nashik : शहरात 76 टक्के बालकांना पोलिओ डोस, उर्वरित बालकांना घरी जाऊन लस देणार

0
Nashik : शहरात 76 टक्के बालकांना पोलिओ डोस, उर्वरित बालकांना घरी जाऊन लस देणार

Nashik : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत (National Pulse Polio Immunization Campaign) नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील ० ते ५ वर्षे वयोगटातील १ लाख ५८ हजार १६१ बालकांना रविवारी (दि. २८) पोलिओ प्रतिबंधक डोस देण्यात आला. शहरासाठी निश्चित करण्यात आलेल्या २ लाख ७ हजार ५६० लाभार्थ्यांपैकी ७६ टक्के लसीकरण पूर्ण झाले.

पोलिओ हा मुलांमध्ये कायमस्वरूपी अपंगत्व निर्माण करणारा गंभीर आजार असून, त्यावर प्रभावी उपचार नाहीत. त्यामुळे प्रतिबंधक लसीकरण हाच सर्वात सुरक्षित उपाय आहे. या कारणामुळे नुकत्याच जन्माला आलेल्या बाळापासून ते ५ वर्षांपर्यंतच्या प्रत्येक लहान मुलाला पोलिओचे दोन थेंब देणे पालकांसाठी अत्यंत आवश्यक आहे.

https://prahaar.in/2026/06/29/nasrapur-case-bhimrao-kamble-the-accused-in-the-nasrapur-atrocity-case-sentenced-to-death/

शहरातील विविध भागांतही पोलिओ बूथचे उद्घाटन करण्यात आले. पहिल्या दिवशी लसीकरणापासून वंचित राहिलेल्या २४ टक्के बालकांसाठी २९ जून ते ३ जुलै या कालावधीत विशेष घरोघरी मोहीम राबविण्यात येणार आहे. या कालावधीत मनपाचे आरोग्य कर्मचारी प्रत्येक घरी जाऊन बालकांना पोलिओची लस देणार असून, एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.

दरम्यान या मोहिमेचे उद्घाटन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पंचवटीतील हिरावाडी येथे झाले. यावेळी महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, मनपा आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन उपस्थित होते.

https://prahaar.in/2026/06/29/nashik-tcs-case-major-evidence-emerges-in-the-nashik-conversion-case/

किरकोळ वादातून दोघा अल्पवयीन मुलांवर वार

तर नाशिकरोड येथे दोन वेगवेगळया घटनांमध्ये दोन अल्पवयीन मुलांवर धारदार हत्याराने वार करण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले असून किरकोळ वादातून झालेल्या प्रकाराने दोघे मुले गंभीर अवस्थेत उपचार घेत आहेत. याप्रकरणी उपनगर (Upnagar Police Station) व नाशिकरोड पोलिस ठाण्यात (Nashik Road Police Station) संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

के. जे. मेहता शाळेजवळील चव्हाण मळा परिसरात कामाचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलावर धारदार शस्त्राने वार करून तसेच टिकावाच्या दांड्याने मारहाण केल्याची घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चव्हाण मळा येथे राहणारा अल्पवयीन मुलगा बुधवारी दुपारी सुमारे चार वाजता शेजारी राहणाऱ्या संजय शिंदे यांच्याकडे कामाचे पैसे मागण्यासाठी गेला होता. त्यावेळी संजय शिंदे याने ‘रोज पैसे मागायला येतोस, तुझी रोजची कटकट आहे, थांब, तुझ्याकडे बघतोच’, असे म्हणत सोबतच्या एकासोबत या अल्पवयीन मुलावर हल्ला केला. कंबरेला लावलेले धारदार शस्त्र काढून पोटरीवर वार केला. यात तो जखमी झाला.

तर आर्टिलरी सेंटर रोडवरील खोले मळा येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून तिघांनी एका अल्पवयीन मुलाला मारहाण करून त्याच्या डोक्यात व दंडावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. देवळालीगाव येथील रोकडोबा वाडीतील अल्पवयीन मुलगा कटिंगसाठी सलूनमध्ये गेला होता. तिघा संशयितांनी त्याला गाठत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here