पुणे : पुण्यातील (Pune) उद्योजक केतन अग्रवाल हत्या (Ketan Agrawal Murder) प्रकरणाचा तपास अधिक वेगाने सुरू असून पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणात महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. तपासाचा भाग म्हणून मुख्य आरोपी सिया गोयलला (Siya Goyal) लोहगड किल्ल्यावर नेऊन घटनास्थळी सीन रिक्रिएशन करण्यात आले. या प्रक्रियेद्वारे घटना नेमकी कशी घडली, याची पडताळणी पोलिसांनी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी पोलिसांनी सियाला लोहगडावर नेले. ज्या ठिकाणावरून केतन अग्रवाल खाली पडल्याचा आरोप आहे, त्या ठिकाणी सियाकडून संपूर्ण घटनाक्रम पुन्हा उभा करण्यात आला. यावेळी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, वरिष्ठ अधिकारी आणि फॉरेन्सिक तज्ज्ञ उपस्थित होते.
https://prahaar.in/2026/06/28/alarm-bells-for-mumbaikars-water-stock-in-supply-lakes-drops-to-7-08-percent/
तपासादरम्यान सियाने घटनास्थळी जाण्यासाठी वापरलेला मार्गही पोलिसांना दाखवला. त्यानंतर डमी बॉडीच्या मदतीने घटनेचे सीन रिक्रिएशन करण्यात आले. पोलिसांनी सियाला त्या वेळी काय घडले, हे प्रत्यक्ष दाखवण्यास सांगितले. या प्रक्रियेतील प्रत्येक हालचाल आणि निरीक्षणाची नोंद तपास पथकाने केली आहे.
या प्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची चौकशी सुरू असून त्यातून अनेक महत्त्वाचे तपशील समोर येत आहेत. यापूर्वी पोलिसांनी सियाच्या आई-वडिलांचीही दीर्घकाळ चौकशी केली होती. तपास यंत्रणा आरोपींचे जबाब, तांत्रिक पुरावे, कॉल रेकॉर्ड, फॉरेन्सिक अहवाल आणि घटनास्थळावरील माहिती यांची सखोल पडताळणी करत आहे.
https://prahaar.in/2026/06/27/mumbai-municipal-corporation-bmc-to-build-a-new-assembly-hall-with-a-seating-capacity-of-350-and-special-arrangements-for-officials-and-journalists/
केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील तपास अंतिम टप्प्याकडे जात असून सीन रिक्रिएशनमधून मिळालेली माहिती तपासासाठी महत्त्वाची ठरणार आहे. सर्व पुराव्यांचा अभ्यास केल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.